अंधेरी के पश्चिम विभाग अंतर्गत वेसावे (Versova) येथे अनधिकृत बांधकामे निष्कासन कारवाई मोहीम सोमवारी ३ जून २०२४ रोजी राबविण्यात आली. बांधकामाच्या प्रक्रियेत असलेल्या तसेच बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली. या इमारतींमध्ये सद्यस्थितीला कोणत्याही व्यक्तींचे वास्तव्य नव्हते. बांधकाम सुरू असणाऱ्या आणि बांधकाम पूर्ण झालेल्या अशा एकूण तीन इमारतींवर कारवाई करण्यात आली. वेसावे परिसरात साचलेल्या गाळामध्ये मच्छीमार बांधवांना बोटी ठेवता येत नसल्याचे पत्र मच्छीमारांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सागरी मंडळाने पाठवले होते. यानिमित्ताने के पश्चिम विभागाचे अधिकारी पाहणी दौऱ्यासाठी आले असताना अनधिकृत बांधकाम आढळून आले, त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. (Versova)
राज्य शासनाच्या मालकीची जमीन
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार तसेच उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार तसेच के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांच्या सूचनेनुसार ही तोडक कारवाई सोमवारी ३ जून २०२४ रोजी पार पडली. या कारवाई मोहिमेमध्ये अभियंते आणि कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस यांनी योगदान दिले. या तोडक कारवाईत जमिनीची मालकी राज्य शासनाची आहे. सागरी प्रभाव क्षेत्र (CRZ) क्षेत्र अंतर्गत ही अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली होती. महानगरपालिकेमार्फत स्वतःहून पुढाकार घेत ही कार्यवाही केली. या बांधकामांना ‘काम थांबवा’ याबाबत नोटीस देण्यात आली आहे. (Versova)
(हेही वाचा – Muslim धर्मांधांनी नाल्यात उभारला बेकायदेशीर मदरसा)
नोटीस देत इमारतींचे बांधकाम तोडले
तसेच तोडक कारवाईच्या आधी या बांधकामांना नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार तीन इमारतींवर तोडक कार्यवाही करण्यात आली. तोडण्यात आलेल्या या तीन इमारतींमध्ये बांधकाम प्रक्रियेअंतर्गत एक इमारतीचा तळ मजला, एक इमारतीचा पहिला मजला तर बांधकाम पूर्ण झालेल्या एक पाच मजल्याची इमारत जमिनदोस्त करण्यात आली. पोकलेन, दोन जेसीबी मशीन, इलेक्ट्रिक ब्रेकर्स तसेच ७० कामगार आणि २० अभियंत्यांच्या मदतीने ही तोडक कार्यवाही पार पडली. (Versova)
साचलेल्या गाळामध्ये मच्छीमार बांधवांना बोटी ठेवण्यास अडचण
वेसावे परिसरात साचलेल्या गाळामध्ये मच्छीमार बांधवांना बोटी ठेवता येत नसल्याचे पत्र मच्छीमारांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सागरी मंडळाने पाठवले होते. यानिमित्ताने के पश्चिम विभागाचे अधिकारी पाहणी दौऱ्यासाठी आले असताना अनधिकृत बांधकाम आढळल्याने ही कार्यवाही मोहीम स्थानिक पातळीवर हाती घेण्यात आली. (Versova)
अनधिकृत बांधकामांची यादी तयार
बांधकाम सुरू असलेल्या आणि बांधकाम पूर्ण झालेल्या बांधकामांवर पोलिसांच्या मदतीने तोडक कार्यवाही पूर्ण करण्यात आली. तसेच आगामी कालावधीत पोलीसांच्या मदतीने तोडक कार्यवाही राबविण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या अनुषंगाने यादी तयार करण्यात येत असल्याची माहिती के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी दिली. (Versova)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community