मुंबईतील महत्वाकांक्षी असलेला मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाची (Coastal Road Project) डेडलाईन चुकली असून अद्यापही काम पूर्ण झाले नाही. यामुळे मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाच्या कंत्राटदाराला फक्त 35 कोटींचा दंड आकारल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई पालिकेने दिली आहे. अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाच्या विलंबाविषयी माहिती विचारली होती. मुंबई किनारा रस्ता प्रकल्प विभागाने अनिल गलगली यांस कळविले की मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम 3 भागांमध्ये विभागले आहे.
प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस टप्प्याचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो यांना दिले असून आतापर्यंत या कामात 11.63 कोटींचा दंड आकारला आहे. यापूर्वी हे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 12 ऑक्टोबर 2022 होती. मात्र काम पूर्ण न झाल्याने 9 जून 2023, 10 सप्टेंबर 2023 आणि 22 में 2025 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.
(हेही वाचा – bangladesh violence: बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर; बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा फोडला)
बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे दुसऱ्या टप्प्याचे काम मेसर्स एचसीसी-एचडीसी यांना दिले असून या कामात 16.13 कोटींचा दंड आकारला आहे. भाग 2 चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 15 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 6 ऑक्टोबर 2023, 7 ऑक्टोबर 2023 आणि 25 ऑक्टोबर 2024 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क पर्यंतचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो यास दिले असून आतापर्यंत या कामात 7.25 कोटींचा दंड आकारला आहे. हे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 12 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 25 मे 2023, 26 नोव्हेंबर 2023 आणि 2 एप्रिल 2024 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आजतागायत 91 टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लार्सन अँड टूर्बो तर्फे 23 जुलै 2024 रोजी लेखी पत्र पाठवून 181 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. यात 8 कारणे सांगत मुदतवाढ मागितली आहे. (Coastal Road Project)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community