- सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर प्रशासक नियुक्त करण्यात आला असून अद्यापही निवडणूक घेण्यात न आल्याने आधीच निवडून येणाऱ्या नगरसेवकांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. त्यातच आता सोसायट्यांना कचरा पेट्या उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांना अर्ज करण्याचे तसेच हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. त्याच सर्व प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी तसेच समस्या मांडण्यांसाठी व्हॉट्स चॅटबॉटच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा देण्यात आल्याने आता जनतेला नगरसेवकांची गरजच भासत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्याने जनतेला आता नगरसेवकांचीच गरजच भासणार नसून नगरसेवकांचे अस्तित्वच आता संपुष्टात येत आहे. (BMC)
मुंबई महापालिकेत सध्या नगरसेवक नसल्याने प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पायाभूत सेवा सुविधा पुरवल्या जात आहे. नगरसेवकच नसल्याने जनतेला आता आपल्या विभागातील नागरी कामांचे प्रश्न आणि समस्या कुठे मागायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच नगरसेवकही आपण आता नगरसेवक नसल्याचे सांगत आहेत, तसेच ते उपलब्ध होत नाही. त्यातच महापालिका प्रशासनाने माय बीएमसी अशा प्रकारे एक्स ही समाज माध्यमे विभाग कार्यालय निहाय उपलब्ध करून दिली आहेत. या एक्स समाज माध्यमावर जनतेला आपल्या विभागातील पाणी, घनकचरा, अनधिकृत बांधकाम, फेरीवाले, रस्त्यावरील खड्डे, उद्यानांची दुरवस्था आदी प्रकारच्या विविध खात्यांसंदर्भातील समस्या तथा तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिली आहे. (BMC)
(हेही वाचा – Mangal Prabhat Lodha : प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार)
ऑनलाईन सर्व सेवा मिळवण्याचा प्रयत्न
तसेच याबरोबरच मुंबईतील जनतेला व्हॉट्स अप चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. ज्या व्हॉट्स अप चॅटबॉटद्वारे ८९९९-२२-८९९९ या क्रमांकाद्वारे जनतेला मोबाईलवरून तक्रारी तसेच समस्या मांडण्याचे तसेच सेवा सुविधा मिळवण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे या सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाल्याने जनतेला आता नगरसेवकांकडे जाण्याची किंवा महापालिकेत जाण्याची गरज नाही. त्यामुळे मोबाईलवरच ऑनलाईन तक्रारी तथा समस्या मांडल्यास त्याचे निराकरण होते. त्यातच आता ज्या कचरा पेटीसाठी सोसायट्यांना नगरसेवकांना विनंती करावी लागत होती, त्या कचरा पेट्या सोसायट्यांना अर्ज केल्यास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने जनतेला आता नगरसेवकांची गरजच भासत नाही. (BMC)
परिणामी जनतेनेही आता नगरसेवकांकडे जाण्याऐवजी ऑनलाईन सर्व सेवा मिळवण्याचा प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे कुणालाही नगरसेवकांच्या कार्यालयात पायधुळ झाडणे किंवा विनंती करण्याची आवश्यकताच नसल्याने भविष्यात नगरसेवकांची गरजच काय असा प्रश्न आता जनतेकडून केला जात आहे. त्यामुळे ऑनलाईन सुविधांमुळे प्रशासन आणि जनतेमध्ये दुवा असणाऱ्या नगरसेवकांचे अस्तित्व सपवून टाकले जात आहे. ऑनलाईन सेवांमुळे प्रशासन जनतेच्या थेट संपर्कात गेले असून यामुळे भविष्यात नगरसेवक पदाला फारसे महत्वे राहणार नसल्याचेही जनतेचे म्हणणे आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community