Bandra Skywalk चा खर्च १६ कोटींवरून पोहोचला ८० कोटींवर

मुंबईमध्ये एमएमआरडीएच्यावतीने स्कायवॉकचे बांधकाम सन २००६ पासून हाती घेण्यात आले होते, त्यानुसार सन २००७मध्ये वांद्रे पूर्व ते न्यायालय आणि कला नगर जंक्शनला जोडणाऱ्या मुंबईतील पहिल्या स्कायवॉकचे बांधकाम करत त्याचे लोकार्पण केले.

684
Bandra Skywalk चा खर्च १६ कोटींवरून पोहोचला ८० कोटींवर

मुंबईतील सर्वांत पहिला स्कायवॉक जमिनदोस्त करण्यात आल्यानंतर आता याच ठिकाणी महापालिकेच्यावतीने नव्याने स्कायवॉक बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या (MMRDA) बांधलेल्या या पहिल्या स्कायवॉकचे बांधकाम धोकादायक झाल्याने ते पाडण्यात आले होते, परंतु याच वांद्रे पूर्व ते न्यायालय आणि कलानगर जंक्शनला जोडल्या जाणाऱ्या या स्कायवॉकचे बांधकाम महापालिकेच्यावतीने हाती घेत त्यावर जीएसटीसह सुमारे ८० कोटी रुपये खर्च केली जाणार आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या बांधकामासाठी जिथे सुमारे १६ कोटी रुपये खर्च केले जाणार होते. (Bandra Skywalk)

मुंबईमध्ये एमएमआरडीएच्यावतीने (MMRDA) स्कायवॉकचे बांधकाम सन २००६ पासून हाती घेण्यात आले होते, त्यानुसार सन २००७मध्ये वांद्रे पूर्व ते न्यायालय आणि कला नगर जंक्शनला जोडणाऱ्या मुंबईतील पहिल्या स्कायवॉकचे बांधकाम करत त्याचे लोकार्पण केले. त्यानंतर सन २०१५ मध्ये ही आकाशमार्गिका महानगरपालिकेकडे हस्तांततरीत केली. या आकाशमार्गिकेचे स्थितीदर्शक व पुनः सर्वेक्षण व्ही. जे. टी. आय. या संस्थेमार्फत करण्यात आले आणि त्या अहवालात या स्कायवॉकचे बांधकाम धोकादायक आढळून आले. हे स्कायवॉक २०१९ पासून पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे हे स्कायवॉक पाडून त्याचे नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेच्यावतीने घेण्यात आला. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून जानेवारी २०२२ रोजी यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करून बांधकामासाठीचे कार्यादेश देण्यात आला होता. (Bandra Skywalk)

(हेही वाचा – Accident: समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाचा घटनास्थळीच मृत्यू, ४ जखमी)

नवीन स्कायवॉकचे बांधकाम हे इतके मीटर असणार 

त्यामध्ये स्कायवॉक हे ४८३ मीटर व ४.२ मीटर लांबीचे बांधण्यात येणार होते. यासाठी १६.२० कोटी रुपये एवढा खर्च अंदाजित होता. परंतु यासंदर्भात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली आणि त्यामध्ये न्यायालयाने हे स्कायवॉक पश्चिम द्रुतगती मार्ग (W.E.H) ओलांडून म्हाडा कार्यालयापर्यंत करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलून योग्य ती कार्यवाही करण्याचे महापालिकेला सूचविले. तसेच, या स्कायवॉकमध्ये सरकते जिने, प्रकाश दिवे इत्यादी तसेच उच्च प्रतीची गुणवत्ता व दिर्घकाळ टिकाऊ बनविण्याचे सुचविले. त्यामुळे यासाठी नेमलेल्या पहिलेले कंत्राट रद्द करून नव्याने कंत्राट देण्यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे नवीन निविदेमध्ये पूर्वीच्या ४८३ मीटरच्या तुलनेत या नवीन स्कायवॉकचे बांधकाम हे ७२० मीटर एवढे केले जात आहे. ज्यामध्ये १६. २० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या तुलनेत प्रशासनाने या स्कायवॉकच्या बांधकासाठी ८३.०६ कोटी रुपयांचा अंदाजित रक्कम निश्चित करून निविदा मागवली. यामध्ये उणे १८.५४ टक्के बोली लावून श्री मंगलम बिल्डकॉन ही कंपनीने जीएसटीसह ७९.८४ कोटी रुपयांमध्ये काम मिळवले आहे. तर विविध करांसह या स्कायवॉकच्या बांधकामाचा खर्च हा १०६ कोटींच्या घरांत जाऊन पोहोचला आहे. (Bandra Skywalk)

स्कायवॉकच्या बांधकामाची वैशिष्ट्ये

पुलाची लांबी : ७४० मीटर.

पुलाची रुंदी : ५१५ मीटर पर्यंत ६.५ मीटर, २२५ मीटर पर्यंत ४.३ मीटर.

बांधकामाचा प्रकार : पोलाद, आरसीसी आणि स्ट्रक्चरल स्टील पिअर कॅप्स.

खास वैशिष्ट्ये : तीन स्वयंचलित जिने. (Bandra Skywalk)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.