मुंबईतील सर्वच रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करतानाच सहा मीटर खालील रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचीही कामे महापालिकेने हाती घेतली आहे. मागील वर्षी हाती घेतलेल्या या छोट्या रस्त्यांची कामे आत पूर्ण होत आली असून यासाठी तब्बल २६.१७ कोटींचा खर्च वाढला आहे. त्यामुळे या छोट्या रस्त्यांच्या कामांवर तब्बल ६० कोटींचा खर्च झाला आहे. (Mumbai Road Cement Concreting)
महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाच्यावतीने विविध भागांमधील सहा मीटर खालील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पॅसेजमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांच्या उपप्रमुख अभियंता विभागाच्यावतीने कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती. या रस्त्यांच्या कामांची निविदा रस्ते विभागाच्यावतीने काढण्यात आल्यांनतर याची देखभाल विभाग कार्यालयाच्या माध्यमातून केली जाते. (Mumbai Road Cement Concreting)
मागील वर्षी हाती घेतलेल्या सहा मीटर खालील छोट्या रस्त्यांच्या कामांसाठी ३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु ही कामे आता पूर्ण झाल्याने आता यासाठी २६ कोटींच खर्च वाढलेला आहे. त्यामुळे या छोट्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी सुमारे ६० कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी हाती घेतलेल्या या कामांसाठी सन २०२३-२४च्या वर्षांत ३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु यासाठीचा निधी कमी पडल्याने वाढलेल्या खर्चाची २६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येत आहे. त्यामुळे ही अतिरिक्त आवश्यक असलेल्या २६ कोटी रुपयांचा निधी सिमेंट काँक्रिटीकरणाच्या अंतिम देयकाच्या अधिदानासह मुख्य रस्ते आणि संगमस्थानाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी असलेल्या ३०० कोटी रुपयांच्या निधीमधून ६० कोटी रुपयांचा निधी वळता करण्यात येणार आहे. (Mumbai Road Cement Concreting)
(हेही वाचा – Hasan Mushrif : संजय राऊतांनी मंत्रिमंडळातील गँगवॉर सिध्द करावे; आम्ही राजीनामे देऊ)
पूर्वी या छोट्या रस्त्यांची कामे नगरसेवक निधीतून केली जायची आणि या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक लावले जायचे. परंतु ही कामे आता रस्ते विभागाच्यावतीने हाती घेऊन विभाग कार्यालयाच्या देखरेखीखाली ही कामे केली जात आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार ३० फुटांपर्यंत अर्थात सहा मीटरच्या खालील या रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. (Mumbai Road Cement Concreting)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community