पेडर रोडच्या त्या खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचा खर्च १० कोटींनी वाढला

239
पेडर रोडच्या त्या खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचा खर्च १० कोटींनी वाढला
पेडर रोडच्या त्या खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचा खर्च १० कोटींनी वाढला

दक्षिण मुंबईतील बी. जी. खेर मार्ग अर्थात पेडर मार्गावरील खचलेल्या भागाची दुरुस्ती करण्याचा खर्च तब्बल दहा कोटी रुपयांनी वाढलेला आहे. या परिसराच्या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार होते, परंतु या डांबरी रस्त्याऐवजी या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. शिवाय पर्जन्य जलवाहिनी टाकणे, हेरिटेज प्रकारची सुरक्षा जाळी बसवणे, हेरिटेज प्रकारचे पथदिवे तसेच संरक्षक भिंतीची रंगरंगोटीसह लँडस्केपिंगद्वारे या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा वाढीव कामांचा यात समावेश करण्यात आल्याने हा दहा कोटी रुपयांचा खर्च वाढल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हाँगिंग गार्डन लगत पाटकर मार्गावरील भिंत कोसळली आणि बी. जी. खेर मार्ग व पाटकर मार्ग मधील भाग ढासळला. त्यामुळे बरीच झाडे उन्मळून पडली, त्यामुळे हा रस्ता पूर्णत: बंद झाला. या रस्त्यावरुन अतिमहत्वाच्या व्यक्ती जात असून, मंत्रालय, राजभवन, ऑगस्ट क्रांती मैदानासह सह्याद्री अतिथीगृह यापरिसरात असल्याने याठिकाणी जाणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तींची ये जा याच रस्त्यावरुन होत असते. त्यामुळे तातडीने येथील जलवाहिनी बदलून रस्त्यांच्या कामांसाठी विविध करांसह १९.८६ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती.

त्यावेळी या रस्त्याची मास्टिक डांबरीकरणाद्वारे सुधारणा करण्यात येणार होती, परंतु या बी. जी. खेर मार्गाचे सिमेंटी काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अन्य कामांचा त्यामध्ये समावेश करण्यात आली. ज्यामध्ये टेकडीवरील निखळलेल्या दगडास मोठे तडे गेल्याने रॉक अँकरींग करणे व सिमेंट वाळूच्या मिश्रणाद्वारे प्रेशर ग्राऊंटिंग करणे आदींचा निर्णय तांत्रिक समितीने घेतल्याने या कामांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. तसेच सल्लागारांच्या सल्ल्यानुसार रस्त्यालगत ४५ मिमी व ६०० मिमी व्यासाची पर्जन्यजलवाहिनी टाकण्याच्या कामाचाही त्यात समावेश करण्यात आला.

(हेही वाचा – आमचं सरकार हे रोजगार देणारं सरकार आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

बी. जी. खेर मार्ग हा रस्ता हँगिंग गार्डन, कमला नेहरु पार्क या पर्यटन स्थळाजवळ येत असल्याने रस्त्याच्या उतारावरील बाजुस संरक्षणात्मक हेरिटेज प्रकारची सुरक्षा जाळी, हेरिटेज प्रकारचे पथदिवे, तटरक्षक भिंतीसमोर असलेल्या दगडावर शिल्प लावणे, संरक्षक भिंतीस करणे व लँड स्केपिंगद्वारें सुशोभिकरण आदी कामे सुचवण्यात आली आहे. त्यामुळे या कामांचे मुळ कंत्राट १५.८९ कोटी रुपयांवरून तो हा खर्च मूळ कंत्राट विविध करांसह १९.८६ कोटी रुपयांवरून २९.२७ कोटी रुपयांनी वाढला गेला आहे. हे काम करण्यासाठी देव इंजिनिअर्स या कंपनीची निवड करण्यात आली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.