कुर्ला-कलिनातील मिठी नदीवरील पुलाच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून कुर्ला येथील नवीन मारवाह मार्गावरील पूलाचे अतिरिक्त बांधकाम करून घेण्यात आले. परंतु या अतिरिक्त कामांचा खर्चही आता साडेतीन कोटींनी वाढला आहे. त्यामुळे मुळ कंत्राट कामांचा खर्च विविध करांसह १८ कोटींवरून तब्बल विविध करांसह ३६.५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सन २०१८ मध्ये हाती घेतलेल्या कुर्ला कलिनातील मिठी नदीच्या कंत्राट कामांमध्ये मारवाह मार्गावरील पुलाचे काम विना निविदा दिल्याने हा खर्च तब्बल दुपटीने वाढला आहे. (Kurla-Kalina Mithi River Bridge)
कुर्ला एल विभागात कुर्ला-कलिना रस्त्यावर मिठी नदीवरील अस्तित्वात असलेल्या पुलाच्या रुंदीकरण कामाचे कंत्राट स्थायी समितीच्या ७ एप्रिल २०१८ च्या मंजुरीने देण्यात आले. या पुलाच्या कामांसाठी १४ कोटी २२ लाख रुपये अर्थात विविध करांसह १८.०७ कोटी रुपयांचे कंत्राट ए. आर. कन्स्ट्रक्शन देण्यात आले होते. हे काम पावसाळा वगळून १९ महिन्यांच्या कालावधीमध्ये होणे अपेक्षित होते. त्यामुळे नियमानुसार हे काम मे २०२१ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु हे काम वाढीव मुदतीतही पूर्ण करता आलेले नाही. (Kurla-Kalina Mithi River Bridge)
मात्र, हे काम अर्धवट असताना प्रशासनाने कोणत्याही प्रकारची निविदा न काढता संबंधित कंत्राटदारालाच ९.६६ कोटींचे अर्थात विविध करांसह १४.३६ कोटी रुपयांचे काम बहाल केले आहे. कुर्ल्यातील कृष्णलाल मारवाह मार्गावरील पिकनिक हॉटेलजवळ ७ मीटर रुंदीचा मारवाह नावाचा पूल अस्तित्वात आहे. या पुलाची दक्षिणेकडील भिंत ११ जून २०२१ रोजी कोसळल्यामुळे व पुलाच्या स्लॅबला तडे गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. हा पूल साकीविहार रस्ता व मरोळ मरोशी रोडवरील सेव्हन हिल्स कोविड हॉस्पिटलला जाण्याकरताचा मुख्य मार्ग आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने सेव्हन हिल्स कोविड रुग्णालयाला जाण्याकरता अंधेरी कुर्ला घाटकोपर मार्गावर जाण्यासाठी ४ ते ५ कि. मी वळून जावे लागले. त्यामुळे या पुलाचे काम त्वरीत करण्यासाठी कुर्ला-कलिना मिठी नदी पुलाचे काम करणारे कंत्राटदार ए. आर. कंस्ट्रक्शन यांना मारवाह पुलाच्या पुनर्बांधणीचे अतिरिक्त काम देण्यात आले आहे. (Kurla-Kalina Mithi River Bridge)
(हेही वाचा – Maratha Reservation : मनोज जरांगे आणि गिरीश महाजन यांच्यात नेमकी काय झाली चर्चा)
हे काम सध्या सुरु असून त्यामध्ये तानसा पाईपलाईनची सद्यस्थिती लक्षात घेऊन पुलाचा सर्वसाधारण आराखडा अद्ययावत करताना पुलाची लांबी ३.१० मीटरने वाढली आहे. तसेच, पुलाच्या पश्चिमेकडील पोहोच रस्ता व लगतच्या जमिनीची पातळी यात फरक असल्यामुळे या पोहोच रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंतीचा पाया खुले खोदकाम करून बांधण्याचे निश्चित केले होते. परंतू, प्रत्यक्ष खोदकाम करताना नियोजित जागेवर पाणी खात्याची जलवाहिनी, टाटा आणि अदानी कंपनीच्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, या जागेवर खुले खोदकाम करणे शक्य नसल्याने संरक्षण भिंतीच्या पायासाठी पाईल फाऊंडेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वाढीव कामांसह विविध करांसह अतिरिक्त ४ कोटी रुपये खर्च होत आहे. त्यामुळे या मारवाह मार्गावरील पुलाचा खर्च १४ कोटींहून चार कोटी वाढून १८ कोटी रुपये वाढले आहे. त्यामुळे मारवाह मार्गावरील पुलाचे अतिरिक्त काम कुर्ला कलिना मार्गावरील मिठीनदीवरील पुलाच्या बांधकामाचा खर्चही यामुळे १८ कोटींवरून ३६ कोटींवर पोहोचल्याची माहिती मिळत आहे. (Kurla-Kalina Mithi River Bridge)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community