भारतीय संस्कृती टिकली तरच देश टिकेल; उपराष्ट्रपती Jagdeep Dhankhar यांचे प्रतिपादन

38
भारतीय संस्कृती टिकली तरच देश टिकेल; उपराष्ट्रपती Jagdeep Dhankhar यांचे प्रतिपादन
  • प्रतिनिधी 

देशाची संस्कृती टिकविणे प्रत्येक भारतीय व्यक्तीचे कर्तव्य आहे. कारण भारतीय संस्कृती टिकली तरच देश टिकेल. राजधानीत होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देखील संस्कृती जपण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी गुरुवारी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त साहित्य महामंडळाचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. त्यावेळी उपराष्ट्रपती बोलत होते.

(हेही वाचा – केंद्र सरकारच्या ‘Agristack’ या नव्या उपक्रमामुळे एका क्लिकवर मिळणार जमिनीच्या खरेदी-विक्रीची माहिती)

उपराष्ट्रपती धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी 98 व्या साहित्य संमेलनासाठी दिल्लीत आलेल्या मराठी लोकांशी संवाद साधला. यावेळी स्वागतध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. धनखड यांनी कवीवर्य सुरेश भट यांची “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी!” ही कविता अभिमानाने वाचून दाखविली. ते म्हणाले की, भाषा ही आपली ओळख आणि अस्तित्व आहे. भाषेचा विकास नाही झाला तर इतिहासाची सुद्धा वाढ होणार नाही. म्हणून आपल्या भाषेला समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

(हेही वाचा – दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी State Govt कडून अतिरिक्त २ कोटींचा निधी मंजूर)

उपराष्ट्रपती धनखड (Jagdeep Dhankhar) पुढे म्हणाले, भाषा साहित्याच्या पलीकडे विस्तारते कारण ती समकालीन परिस्थिती, प्रचलित परिस्थिती आणि त्या काळातील आव्हाने परिभाषित करते आणि त्याचबरोबर ज्ञानावारलक्ष केंद्रित करते. भारत सरकारने मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता दिल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, उपराष्ट्रपतींनी मराठा सार्वभौमत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व आणि पराक्रमाचा उल्लेख केला. स्वाभिमान आणि अभिमानाचा दाखला द्यायचा असेल तर तो मराठ्यांच्या अभिमानाचा द्यावा लागेल असेही ते म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री आणि स्वागतध्यक्ष शरद पवार म्हणाले की, उपराष्ट्रपती (Jagdeep Dhankhar) यांनी साहित्य संमेलनाच्या शिष्टमंडळाला संवादासाठी बोलावून मराठी भाषेचा सन्मान केला आहे. मराठी माणूस हा महाराष्ट्रात राहत असला तरी तो विचार देशाच्या विकासाचा करतो असेही पवार म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.