लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा आनंदी क्षण, मात्र काहींना आपल्या लग्नामध्ये हौस मौज करणे शक्य नसते, परंतु पुणे जिल्हातील एका कुटुंबाने आपल्या 73 वर्षीय वडील व 68 वर्षीय आईच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पुन्हा पूर्णपणे वैदिक पद्धतीने विवाह करत आई-वडिलांना एक अनोखी भेट दिल्याचे पाहायला मिळाले.
आई-वडिलांच्या कष्टाची जाण
शिरूर तालुक्याच्या शिक्रापूर येथील प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल थोरवे यांच्या आई माणिकबाई व वडील रामदास यांचा 1972 सालच्या दुष्काळात विवाह झाला होता. त्यांनतर या दाम्पत्याने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून कष्टाने संसार उभा करून आपल्या दोन मुले, दोन मुलींचे शिक्षण करत त्यांचाही संसार उभा करून दिला,आपल्या आई-वडिलांच्या कर्तुत्वाची जाणीव त्यांच्या चारही मुलांना आहे, आई-वडील नेहमी त्यांना त्यांच्या जुन्या दिवसांचे धडे देत होते, तसेच समाजामध्ये वावरत असताना होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पाहून आपल्या आई वडिलांचा बाबतीत असा कोणताच कार्यक्रम कधी झाला नसल्याची सल या चारही भावंडांमध्ये होती.
( हेही वाचा: राऊतांच्या ‘त्या’ विधानाकडे पवारांनी केले दुर्लक्ष )
कुटुंब भावुक
त्यामुळे त्यांनी आपल्या आई वडिलांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत, आई वडिलांचा पुन्हा विवाह करण्याचा निर्णय अविनाश थोरवे, अतुल थोरवे, वैशाली आदक, अर्चना येन्धे या चारही मुलांनी घेतला आणि पुन्हा एकदा आई-वडिलांचा वाजत -गाजत विवाह सोहळा साजरा केला. यावेळेस आई वडिलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला. या लग्न समारंभानंतर संपूर्ण थोरवे कुटुंब भावुक झाल्याचे पाहयला मिळाले. यावेळी त्यांची मुलं- मुली नातू तसेच पाहुणे, मित्रमंडळी यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
Join Our WhatsApp Community