पुणे- मुंबई रेल्वेमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद

मुंबई पुण्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खंडाळा आणि लोणावळ्याच्या दरम्यान, दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वेवाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच रेल्वेसेवा पुर्ववत केली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. लोणावळ्यातील मंकी हिलजवळ दरड कोसळल्याची माहिती आहे.

( हेही वाचा: आता रेल्वे प्रवाशांना मिळणार खासगी वैद्यकीय सेवा; रेल्वेने मागवले डॉक्टरांकडून प्रस्ताव )

अप लाईनवर ही दरड कोसळल्याने, मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळवण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरु आहे. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट शुक्रवारी लोणावळ्यानजिक पुणे- मुंबई लोहमार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. बोल्डर आणि ओएचईचा खांब पडल्याने मार्ग ठप्प झाला आहे. अप लाईनवर दरड कोसळल्याने, वाहतूक मि़डल लाईनकडे वळवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here