सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला असून पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे आता नागरिक इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय निवडत आहेत. ग्राहकांचा इलेक्ट्रिक गाड्यांकडचा कल दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळेच बाजारात नवनवीन इलेक्ट्रिक गाड्यांचे आगमन होत आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन क्रेयॉन एन्वी (Crayon Envy) ही लो स्पीड गाडी लॉंच करण्यात आली आहे.
( हेही वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, ‘या’ जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणार वाढ! )
या गाडीची वैशिष्ट्ये
या गाडीची वैशिष्ट्ये म्हणजे ही गाडी चावीशिवाय सुरू होते म्हणजेच याक कीलेस स्टार्टअप आहे. पांढरा, काळा, निळा, सिल्वर अशा चार रंगांच्या पर्यायांमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. या गाडीची किंमत ६४ हजार रुपये इतकी आहे. ही गाडी अगदी लहान जागेतही पार्क करता येऊ शकते. या गाडीच्या चार्जिंगचा खर्च १४ पैसे प्रति किलोमीटर आहे हा खर्च इंधनाच्या तुलनेत फारच कमी आहे.
कम्फर्ट सीट्स
या गाडीला अतिशय कम्फर्ट सीट्स दिल्या आहेत. या गाडीत डिजिटल स्पीडोमीटर आणि मोबाईल चार्जिंग पोर्ट आहे. सिंगल चार्जमध्ये ही आकर्षक गाडी १६० किमी ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. या इलेक्ट्रिक गाडीचा वापर घराजवळच्या, छोट्या-मोठ्या कामांसाठी करू शकतो.
Join Our WhatsApp Community