मराठी पाट्यांसाठी मुदतवाढ नाहीच; अंमलबजावणी झाली नाही तर कारवाई

मुंबईतील दुकाने, आस्थापनांच्या दर्शनी भागात ठळकपणे मराठी पाट्या लावण्यासाठी मुंबई पालिकेची मुदत 30 जूनला सपंत आहे. मात्र दुकानचालक संघटनांच्या माध्यमातून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु पालिकेने या मुदतवाढीस नकार दिला आहे. यापुढे आणखी मुदतवाढ देण्यासाठी कोणतेही सबळ कारण नसल्याची, माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी दिली.

…तर कारवाई केली जाणार 

मराठी पाट्यांची इतक्या कमी वेळात अंमलबजावणी करता येणे शक्य नसल्याने, सहा महिन्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. मात्र मुदतवाढ देण्यास पालिकेने नकार दिला आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत नियमांची अमंलबजावणी न केल्यास कारवाई केली जाईल, असे शर्मा यांनी सांगितले.

( हेही वाचा: 48 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची एकनाथ शिंदे पुनरावृत्ती करणार? शिंदेंच्या ट्वीटमुळे खळबळ )

30 जूनपर्यंत मराठी पाट्यांची अंमलबजावणी

अनेक दुकानदारांनी एलईडी, तसेच मराठीत पाट्यांसाठी काम करणारे कामगार मिळत नसल्याचीही सबब सांगितली. पण ही कारणे आणखी मुदतवाढ देण्यासाठी पुरेशी नसल्याचे, अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच सहा महिन्यांची मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे, स्पष्ट करत 30 जूनपर्यंत मराठी पाट्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दुकानदारांना देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here