Mumbai Municipal Land In Thane : ठाण्याच्या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेचा हातभार

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातील क्लस्टर प्रकल्प ठाण्यातील किसन नगरमध्ये राबवला जात आहे.

121
Mumbai Municipal Land In Thane : ठाण्याच्या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेचा हातभार
Mumbai Municipal Land In Thane : ठाण्याच्या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेचा हातभार
  • सचिन धानजी,मुंबई

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातील क्लस्टर प्रकल्प ठाण्यातील किसन नगरमध्ये राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने खारीचा वाटा उचलला आहे. हा प्रकल्प साकारण्यासाठी मुंबई महापालिकेचा हातभार लागला जाणार असून या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी ठाण्यातील महापालिकेच्या मालकीची जागा ठाणे महापालिकेला दिली जाणार आहे. तर त्याबदल्यात ठाणे महापालिकेच्या मालकीची जागा मुंबई महापालिकेला हस्तांतरीत केली जात आहे. (Mumbai Municipal Land In Thane)

ठाणे येथील किसन नगर येथे नागरी पुनरुत्थापन योजना ठाणे महापालिकेच्यावतीने राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी अधिक भूखंडाची गरज आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या जलअभियंता यांच्या अखत्यारित येणारा भूखंड असून त्यातील बहुतांशी भूखंडाची जागा या प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेला मालकी तत्वावर हस्तांतरीत करण्याचा आणि त्याबदल्यात ठाणे महापालिकेच्या मालकीची ढोकाळी येथील तेवढ्याच्या रेडीरेकनरच्या दरात येणारी जागा मुंबई महापालिकेला मालकी हक्काने हस्तांतरीत करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. (Mumbai Municipal Land In Thane)

ठाणे महापालिकेचे प्रशासक यांनी मार्च २०२३मध्ये महापालिकेला पत्र पाठवून या जागेच्या अदलाबदलीबाबत कळवले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या मालकीची किसन नगर येथील १२ हजार ४९८ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एकूणा जागेपैकी ७७५२.९१ चौरस मीटरची जागा ठाणे महापालिकेला या प्रकल्पासाठी हस्तांतरीत केली जाणार आहे. तर ठाणे महापालिकेच्या मालकीची ढोकाळी येथील ९०९२.५७ चौरस मीटरची जागा मुंबई महापालिकेला कायम स्वरुपी मालकी तत्वावर हस्तांतरीत केली जाणार आहे. किसन नगर येथील ठाणे महापालिकेच्या या किसन नगर येथील यु आर पी १२चे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ जून २०२३ रोजी केले होते. आशियातील सर्वात मोठा असा हा समूह विकास अर्थात क्लस्टर योजना असून या योजनेच्या माध्यमातून तब्बल दहा हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत अनधिकृत व अधिकृत असलेल्या धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना भविष्यात स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. (Mumbai Municipal Land In Thane)

(हेही वाचा – India Vs Pakistan World Cup 2023 : इंडिया -पाकिस्तान सामन्यासाठी भारताची यंत्रणा ‘अलर्ट’ मोडवर)

या संदर्भात महापालिका जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठाण्यातील किसन नगर येथील जागा जलअभियंता विभागाच्या अखत्यारित असली तरी आवश्यक जागा वगळून जी जागा शिल्लक आहे, ती ठाणे महापालिकेला त्यांच्या प्रकल्पासाठी हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर त्याबदल्यात ढोकाळी येथील ठाणे महापालिकेच्या मालकीची जागा मुंबई महापालिकेला मालकी तत्वावर हस्तांतरीत करण्यात येत आहे. या जागेवर महापालिकेच्या वतीने वर्कशॉप उभारले जाणे प्रस्तावित आहे. जागेच्या बाजारभावानुसार ही जागेची अदलाबदली करण्यात येत असून मुंबई महापालिकेने त्यांना दिलेल्या जागेच्या बदल्यात मुंबईला ठाणे महापालिकेची अधिक जागा प्राप्त होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Municipal Land In Thane)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.