गोरेगावमधील पहाडी परिसरातील म्हाडाच्या मुंबई मंडळातील पहिल्या टप्प्यात अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील नागरिकांसाठी 3 हजार 15 घरांच्या बांधकामाला सुरुवात केली असून, यापैकी अल्प आणि अत्यल्प गटातील 2 हजार 683 घरांचा आगामी सोडतीत समावेश करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या घरांच्या बांधकामाला वेग देण्यात आला आहे. या घरांचे बांधकाम मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल असे अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे.
गोरेगाव पहाडी येथे म्हाडाच्या मालकीचा 25 एकर भूखंड असून हा भूखंड मुंबई मंडळाला 25 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर मिळाला आहे. हा भूखंड ताब्यात मिळाल्यानंतर यावर गृहयोजना राबवण्याचा निर्णय घेतला. या जागेवर मोठ्या संख्येने घरे निर्माण होणार असून पहिल्या टप्प्यात मंडळाने यावर गृहयोजना राबवण्याचा निर्णय घेतला.
( हेही वाचा: Employment India: 10 लाख सरकारी पदांसाठी भरती; पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा )
2023 पर्यंत स्वप्नपूर्ती होणार
2019 नंतर मुंबई मंडळाची सोडत निघालेली नाही. तसेच, मुंबई मंडळाकडून एक- दोन वर्षांत तयार होतील अशा गृहयोजना नाहीत. अशावेळी एकमेव पहाडी गोरेगावचा प्रकल्प हीच इच्छुकांसाठी आशा आहे. गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कामाचा आढावा घेतला असून, कामाचा वेग वाढवण्यात आला आहे. फेब्रुवारी – मार्च 2023 पर्यंत घरांचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community