Air Pollution : धुळ प्रदूषण नियंत्रणाच्या यंत्रणाच पडल्या धुळखात, महापालिका उडवते केवळ घोषणांचे फवारे

मागील एप्रिल महिन्यात कंत्राटदाराला कार्यादेश दिल्यानंतरही आठ महिने पूर्ण होऊनही ही यंत्रणा बसवण्यात आलेली नाही.

521
Air Pollution : धुळ प्रदूषण नियंत्रणाच्या यंत्रणाच पडल्या धुळखात, महापालिका उडवते केवळ घोषणांचे फवारे
Air Pollution : धुळ प्रदूषण नियंत्रणाच्या यंत्रणाच पडल्या धुळखात, महापालिका उडवते केवळ घोषणांचे फवारे
  • सचिन धानजी,मुंबई

काही वर्षांपासून मुंबईतील हवा दुषित होत चालली आहे आणि त्याचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने वाहतूक कोंडी होणाऱ्या पाच ठिकाणी खुल्या हवेतील धूळ शमन केंद्र आणि धूळ नियंत्रण प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागील एप्रिल महिन्यात कंत्राटदाराला कार्यादेश दिल्यानंतरही आठ महिने पूर्ण होऊनही ही यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. याबाबतची यंत्रणांचे सुटे भाग उपलब्ध होऊन धुळ खात पडले असून दुसऱ्या बाजुला विभाग कार्यालय आणि इलेक्ट्रीक वितरण कंपन्यांची एनओसीच प्राप्त न झाल्याने ही यंत्रणा आजतागायत बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे धुळीचे प्रदुषण नियंत्रणाच्या नावाखाली महापालिकेचे केवळ घोषणांचे बुडबुडे सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे. (Air Pollution)

New Project 2023 12 02T200501.262

मुंबईतील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्यावतीने ३० धुळ प्रतिबंधक यंत्रे खरेदी करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत असून याची निविदा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कार्यादेश दिल्यानंतर पुढील १८० दिवसांमध्येही ही यंत्रे प्राप्त होतील असा अंदाज आहे. त्यामुळे भाडेतत्वावर २४ विभाग कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी एक याप्रमाणे धूळ प्रतिबंधक यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु एका बाजुला या यंत्रांच्या खरेदीची प्रक्रिया राबवली जात असली तरी एप्रिल २०२३ रोजी मुंबईत वाहतूक कोंडी होणाऱ्या पाच ठिकाणी खुल्या हवेतील धूळ शमन केंद्र (Outdoor Dust Mitigation Unit) यांचे १० नग आणि धूळ नियंत्रण प्रणाली (Dust Monitoring System) ०५ नग अशाप्रकारे ही यंत्रणा खरेदी करून त्यांच्या पुढील तीन वर्षांच्या देखभालीच्या कामासाठी मॅक एनवायरोटेक अँड सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कार्यादेश देण्यात आला होता. यासाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली होती. ही यंत्रणा आठ महिन्यांच्या कालावधीत बसवणे आवश्यक होते. परंतु नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर महिना सुरु झाला तरीही या यंत्रणा अद्यापही मुंबईत बसवण्यात आलेल्या नाहीत. (Air Pollution)

मुंबईतील एलबीएस जंक्शन, छेडा नगर, बीकेसी कलानगर जंक्शन, दहिसर चेकनाका आणि हाजीअली येथील पाच ठिकाणी ही यंत्रणा बसवली जाणार होती, परंतु हाजी अली येथे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने यंत्रणा बसवलेली असल्याने ही जागा बदलून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील ट्रामा केअर रुग्णालय येथील चौकात ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागा निश्चित होऊनही ही यंत्रणा अदयापही बसवण्यात आलेली नाही. यासाठी विभागीय महापालिका कार्यालये, करनिर्धारण व संकलन विभाग, एमएमआरडीए, वीज पुरवठा कंपन्या, वाहतूक पोलीस यांची परवानगी, ना हरकत प्रमाणपत्रांची गरज असून बऱ्याच ठिकाणी यासर्व परवानगी प्रलंबित असल्याने नऊ महिने उलटूनही या यंत्रणा अद्याप बसवण्यात आलेल्य नाही. (Air Pollution)

New Project 2023 12 02T200542.267

महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने पाठपुरावा सुरु असूनही प्रत्येक विभाग कार्यालय, वाहतूक पोलीस, एमएमआरडीए, वीज पुरवठा कंपन्यांकडे पाठपुरावा करूनही या परवानगी वेळीच प्राप्त न झाल्याने याबाबतच्या यंत्रणा उपलब्ध होऊनही त्या सध्या धुळ खात पडल्या आहेत. धुळीचे प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी खरेदी केलेली ही यंत्रणाच आता धुळ खात पडलेली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन धुळीचे प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी कशाप्रकारे घोषणांचे निव्वळ फवारे उडवत आहेत, हे स्पष्ट होत आहे. (Air Pollution)

(हेही वाचा – Mumbai Crime : मिर्झापूर टोळीतील दरोडेखोराला मुंबईत अटक)

या यंत्रांचा काय आहे उपयोग

मागील दशकापासून मुंबईत वाहन वापरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या उत्सर्जनामुळे धुळीचे कण हवेत पसरुन शुध्द हवेची पातळी दिसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे वाहनात उपस्थित असलेल्या नागरीकांना व रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना दुषित हवेत श्वसन करुन दीर्घ आजारांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशात अत्यंत मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर सध्या खालावला आहे. ही बाब लक्षात घेता प्रदूषणासाठी धूळ हा देखील एक घटक कारणीभूत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या अहवाल नुसार पाच ठिकाणी धूळ शमन आणि धूळ नियंत्रण प्रणाली बसवण्याची शिफारस करण्यात आली होती. (Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.