शाळा महाविद्यालयांमध्ये ई-सिगारेटचे व्यसन

147

धुम्रपान सोडण्यास मदत करण्याच्या नावाखाली शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्राॅनिक सिगारेटची विक्री करणा-या 12 ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. 18 लाख 60 हजार रुपयांच्या इलेक्ट्राॅनिक सिगारेटचा साठा जप्त केला आहे. यामध्ये 18 वर्षांखालील मुलांना ना सिगारेटची विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे शाखा नियंत्रण कक्षाकडून ई-सिगारेट उत्पादनांची विक्री करणा-या दुकानदार व इसमांची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरिक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांची 12 वेगवेगळी पथके तयार करुन क्राॅफर्ड मार्केट, नागपाडा, हिरा पन्ना मार्केट, ताडदेव, कार्टररोड, लिंकस्क्वेअर, माॅल, पाली नाका, 14 वा रस्ता खार, लोखंडवाला अंधेरी, मालाड येथे 11 दुकाने व ऑनलाइन पद्धतीने विक्री करणारा एकजण अशा एकूण 12 ठिकाणांवर छापा कारवाई करण्यात आली.

( हेही वाचा: उद्धव ठाकरेंना धक्का; पालघरमधील 50 पदाधिकारी शिंदे गटात सहभागी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.