मुंबईतील वाढत्या धुळीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने बांधकामांना प्रदुषणाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात नोटीस जारी करून कडक कारवाई केली जात असली तरी प्रत्यक्षात महापालिकेच्याच दिव्याखाली अंधार असल्याचे उदाहरण समोर आले आहे. महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सध्या नुतनीकरणाचे काम सुरु असून त्याठिकाणी बांधकामाच्या धुळीचे प्रमाण दिवसभरात प्रचंड वाढले आहे. या बांधकामाच्याठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रदुषणासंदर्भातील प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याने कर्मचाऱ्यांनाच नाका तोंडावर रुमाल लावून फिरावे लागत होते. (Air Pollution)
मुंबईतील प्रदुषणाचे प्रमाण वाढल्याने हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने मार्गदर्शक नियमावली तयार करून त्यानुसार बांधकामांच्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना करत त्यानुसार नोटीस बजावण्यात येत आहे. या नोटीसनंतरही ज्या ज्या बांधकामांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाही, त्या बांधकामांना कारणे दाखवा नोटीस आणि स्टॉप वर्क नोटीस दिल्या जात आहे. (Air Pollution)
मात्र, एका बाजुला मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी बांधकामांना नोटीस देत असले तरी महापालिका मुख्यालयातील विस्तारित इमारतींमध्ये नुतनीकरणाच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महापालिका सचिव विभाग कार्यालयाच्या जागेवर नुतनीकरणाचे काम सुरु असून याठिकाणी हिरवा कपडा लावून या भाग बंदिस्त करण्यात आलेला नाही. (Air Pollution)
(हेही वाचा – Kashmir : काश्मिरातील राजौरी येथे चकमक; २ कॅप्टनसह चार जवान हुतात्मा)
त्यामुळे बुधवारी दिवसभर या मजल्यावर धुळीचे साम्राज्य पसरले होते. या धुळीमुळे कर्मचाऱ्यांना व्हरांड्यातून फिरवणेही अशक्य बनले होते आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना या पॅसेजमधून जाताना तोंडाला रुमाल बांधूनही ये-जा करावी लागत होती. एका बाजुला मुंबईकरांची चिंता करणाऱ्या महापालिकेला आता महापालिका मुख्यालयात सुरु असलेल्या बांधकामांमुळे कर्मचाऱ्यांना होणाऱ्या धुळीच्या त्रासाची चिंता वाटत नाही का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. (Air Pollution)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community