Krida Mahakumbh वरील खर्च अडीच कोटींच्या वर पोहोचला

466
Krida Mahakumbh वरील खर्च अडीच कोटींच्या वर पोहोचला
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका आणि क्रीडा भारतीकडून संयुक्तपणे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ (Krida Mahakumbh) याकरता महापालिकेच्या तिजोरीतून खर्च करण्यात आला आला आहे. या स्पर्धेत केवळ प्रसिद्धी आणि खाऊवरच सुमारे दीड कोटींचा खर्च झाला असून इतर सोशल मिडिया कव्हरेज, मेडल ट्राफी, प्रमाणपत्रे तसेच मंडप स्पिकर, खुर्च्या आदींसाठी सुमारे ८० लाखांहून खर्च करण्यात आल्याने या महाकुंभवरील एकूण खर्च हा अडीच कोटींच्या घरात पोहोचल्याचे दिसून येत आहे. हा सर्व खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला आहे.

राज्यातील जुन्या पारंपारिक खेळांना प्रोत्साहन मिळावे व लुप्त झालेले खेळ समाजात पुन्हा जिवंत व्हावे या उद्देशाने उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा स्पर्धा तसेच मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम जीवन चरित्र या विषयावर चित्रकला, निबंध व कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने या स्पर्धांचे तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या प्रसिध्दीसाठी अर्थात फ्लेक्स आणि बॅनर बनवण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. यामध्ये महाकुंभच्या (Krida Mahakumbh) प्रसिध्दीसाठी ६४ लाख रुपये आणि श्री राम जीवन चरित्रासाठी सुमारे ११ लाख रुपये अशाप्रकारे विविध करांसह ८९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याची माहिती यापूर्वीच समोर आली होती.

(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिक्षण घेतलेल्या शाळेस Veer Savarkar यांची मूर्ती भेट)

खेळ महाकुंभ (Krida Mahakumbh) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थी, पंच आणि पाहुण्यांसाठी खाऊ पुरवण्यासाठी तब्बल ६६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये २ बिस्कीट पुडे आणि ५०० लिटर पाण्याची बॉटल अशाप्रकारे खाऊचा किट देण्यात आला होता. या बॉक्स करता ४० रुपये मोजण्यात आले असून अशाप्रकारचे तब्बल दीड लाख बॉक्सचे वाटप झाले आहे. तर जेवणाचे कंटेनर पॅकींग हे १५० रुपयांमध्ये देण्यात आले आहे. अशाप्रकारे ३ हजार पॅकींग कंटेनरचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे खाऊ आणि प्रसिध्दीवरच महापालिकेच्या शिक्षण विभागाने सुमारे दीड कोटींचा खर्च केल्याची माहिती समोर आली होती आणि आणखी ८० लाखांहून अधिक खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यात प्रभू श्रीराम जीवन चरित्र विषयावर चित्रकला निबंध व कविता लेखन स्पर्धेकरता सोशल मिडियावर कव्हरेज यासाठी सुमारे २४ लाख रुपये,या स्पर्धेकरता मेडल्स ट्रॉफी व प्रमाणपत्र सादर करणे याकरता ४० लाख रुपये आणि आवश्यक मंडप स्पिकर, खुर्च्या व बैठक व्यवस्था पुरवठा खर्च आदींसाठी सुमारे २० लाख रुपये आदी प्रकारे तब्बल ८० लाखांहून आणखी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाकुंभवरील (Krida Mahakumbh) सर्व खर्च हा आता अडीच कोटींच्या वर पोहोचला गेल्याचे पहायला मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.