कोकणातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या शुक्रवारी पुणे मार्केट यार्डात दाखल झाल्या. या पाच डझनांच्या या पेटीला तब्बल ३१ हजार रूपये भाव मिळाला. देवगड हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होतो. त्या पार्श्वभूमीवर हापूस आंबा मार्केट यार्डात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.
रीळ गावातून आले आंबे
रत्नागिरी जिल्ह्यातील रीळ या गावातून शेतकरी मकरंद काने यांच्या बागेतून मे. गणेश फ्रुट एजन्सी, अरविंद मोरे यांच्या गाळ्यावर पाच पेट्या शुक्रवारी आल्या होत्या. लिलावात व्यापारी युवराज काची यांनी तब्बल ३१ हजार रुपयांना एक पेटी याप्रमाणे खरेदी केल्या. बाजार आवारातील ज्येष्ठ अअडते एकनाथ यादव, अडते असोसिएशनचे संचालक गणेश यादव, रावसाहेब कुंजीर, सुनील वंजारी, जगणाथ वंजारी, विनोद परदेशी, सुधीर मनुसुख, माणिक ओसवाल, हमजू भोले, अब्दुल चौधरी, निलेश शिंदे यांच्यासह बाजारातील अडते उपस्थित होते.
(हेही वाचा आता BEST बसमध्येही करा रिझर्वेशन! कसं ते वाचा…)
मोसमाच्या आधीच आंबा खाण्याची इच्छा अनेकांची असते. मात्र त्यासाठी किंमतही तितकीच मोजावी लागत असते. म्हणूनच दरवर्षी आंब्याच्या मोसमात आंब्याची पहिली पेटी बाजारात आली कि त्याची चर्चा जोरदार होत असते. पहिली आंब्याची पेटी कुणी खरेदी केली, कुणी विकली यावर चर्चा होत असते. जगात कोकणातील हापूस आंब्याला पेटंट मिळाले आहे. तेव्हापासून आंब्यांची निर्यात वाढत आहे.
Join Our WhatsApp Community