उन्हाळ्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे मुंबईतील चाकरमानी वर्ग कोकणची वाट धरतात. यादरम्यान अनेक पर्यटकही कोकणाला भेट देतात. अशातच सिंधुदुर्गातीस आंबोलीमध्ये पहिल्या पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन कोकणवासीयांसह पर्यटकही सुखावले आहेत.
( हेही वाचा : सोलो ट्रिपला जाताय? या गोष्टी नक्की लक्षात ठेवा! )
पावसाची हजेरी
राज्यात तापमानाने उच्चांक गाठला असतानाच, कोकणात पावसाने हजेरी लावल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. मात्र, या अवकाळी पावसाचा शेवटच्या टप्प्यात असलेल्या आंब्याला फटका बसणार आहे. कणकवली, कुडाळ या भागात सुद्धा बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली.
पर्यटक सुखावले
दाट धुके, पाऊस, हवेतील गारवा यामुळे पर्यटक मात्र सुखावले आहे. आंबोली घाटामध्ये थांबून पर्यटकांनी या पावसाचा आनंद घेतला. आंबोलीत दरवर्षी मे महिन्यातच पहिल्या पाऊस पडतो. हा पाऊस आणखी काही दिवस पडेल असे जाणकारांचे मत आहे. परंतु जूनच्या १० तारखेपासून आंबोलीत खरा पाऊस सुरू होऊन या घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात.
Join Our WhatsApp Community