Solar Eclipse : नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी

पहिले ग्रहण खग्रास असून दुसरे कंकणाकृती असेल. ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत.

204
Solar Eclipse : नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी
Solar Eclipse : नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी

आगामी २०२४ मध्ये २ सूर्यग्रहण (Solar Eclipse) होणार आहेत. यापैकी पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी होणार असून दुसरे ग्रहण २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिले ग्रहण खग्रास असून दुसरे कंकणाकृती असेल. ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत. (Solar Eclipse)

नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse) ८ एप्रिल २०२४ रोजी रात्री ९ वाजून १२ मिनीटांनी सुरू होऊन मध्यरात्री १.२५ पर्यंत म्हणजे ४ तास २५ मिनीटे राहणार आहे. हे सूर्यग्रहण खग्रास राहणार असून मीन राशीतील रेवती नक्षत्रात होईल. हे ग्रहण पॅसिफिक पश्चिम युरोप, अटलांटिक, आर्क्टिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका (अलास्का वगळता), कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, इंग्लंडचा वायव्य प्रदेश आणि आयर्लंडमध्ये होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात न दिसू लागल्याने त्याला धार्मिक महत्त्वही राहणार नाही आणि तो सुतक काळ मानला जाणार नाही. (Solar Eclipse)

(हेही वाचा – Blockbuster Cinema : २०२३ साली एका दिवसात २८ लाख तिकिटांचा नवा विक्रम )

या ठिकाणी दिसणार ग्रहण 

येत्या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण (Solar Eclipse) २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. कंकणाकृती स्वरूपाचे हे ग्रहण रात्री ९ वाजून १३ मिनीटांनी सुरू होऊन मध्यरात्री ३.१७ वाजता संपेल. या ग्रहणाचा कालावधी तब्बल ६ तास ४ मिनीटे राहणार आहे. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक, आर्क्टिक, चिली, पेरू, होनोलुलू, अंटार्क्टिका, अर्जेंटिना, उरुग्वे, ब्युनोस आयर्स, बेका बेट, फ्रेंच पॉलिनेशिया महासागर, उत्तर अमेरिकेचा दक्षिण भाग, फिजी, नवीन भागात दिसणार आहे. चिली, ब्राझील, मेक्सिको आणि पेरू मध्ये दृश्यमान होईल. हे ग्रहण भारतातही दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध राहणार नाही. हे सूर्यग्रहण कन्या आणि हस्त नक्षत्रात होणार आहे. या दिवशी सूर्यासोबत चंद्र, बुध आणि केतू स्थित असतील. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण हे कंकणाकृती असेल. (Solar Eclipse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.