कामाठीपुरा येथील सिध्दार्थ अर्थात मुरली देवरा मल्टीस्पेशालिटी दवाखान्याच्या जागी आता डोळयाचे नवीन रुग्णालय बांधले जाणार आहे. या मल्टीस्पेशालिटी दवाखान्याची पुनर्बांधणी करून त्याठिकाणी हे नेत्र रुग्णालय बांधले जाणार असून महापालिकेचे पहिले डोळ्याचे रुग्णालय ठरणार आहे.
कामाठीपुरा येथील जुन्या तोडण्यात आलेल्या डोळ्याच्या रुग्णालयाच्या जागेवर नवीन नेत्र रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी महापालिकेच्यावतीने एन.ए. कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली असून, या नवीन नेत्र रुग्णालयाच्या बांधकामासाठी विविध करांसह १३३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
( हेही वाचा: आघाडीचा महामोर्चा तर हिंदूंचा विराट मोर्चा; साम्य आणि अंतर! )
कामाठीपुरामध्ये अंत्यत दाटीवाटीच्या ठिकाणी या दवाखान्याची जागा होती. ज्या जागी या १०० खाटांच्या क्षमतेच्या रुग्णालयाची इमारत बांधली जाणार आहे. यासाठी पर्यावरण विभागाची परवानी प्रतीक्षेत असून ही परवानगी मिळाल्यानंतर या रुग्णालय इमारतीच्या बांधकाला सुरुवात केली जाणार आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांच्याशी संपर्क साधला असता कामाठीपुरा येथील सिध्दार्थ दवाखाना अर्थात मुरली देवरा मल्टीस्पेशालिटी दवाखान्याच्या जागेचा पुनर्विकास करून त्याठिकाणी नवीन नेत्र उभारणीच्या कामाच्या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त झाली आहे. यासाठीच्या कंत्राटदाराची निवड करण्यात आल्याने पर्यावरण विभागाची परवानगी लवकरच मिळेल. त्यानंतर या कामाला सुरुवात केली जाईल, असे सांगितले. हे रुग्णालय १०० खाटांचे असून महापालिकेचे अत्याधुनिक असे पहिले नेत्र रुग्णालय ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community