Wadala : वडाळा रेल्वे स्थानकाच्या परिसरातील पूरपरिस्थिती येणार नियंत्रणात

महापालिकेच्या एफ उत्तर विभागातील वडाळा रेल्वे स्थानकाचा परिसर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परिक्षेत्रात मोडत असून या भागातील पावसाळी जलवाहिन्या मुसळधार पावसात तुडुंब भरुन वाहतात.

186

वडाळा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेच्या परिसरात तसेच एल.एम. नाडकर्णी मार्ग याठिकाणी दरवर्षी तुंबणाऱ्या पावसाच्या पाणी समस्येवर आता पुढील पावसाळ्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची क्षमता वाढवण्यात येत असून येत्या काही दिवसांमध्ये या कामाला सुरुवात होऊन पुढील पावसाळ्यापूर्वी या पर्जन्य जलवाहिन्या नव्याने टाकल्या जातील. त्यामुळे वडाळा रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजुच्या परिसरात किडवाई रोड आणि वडाळा रेल्वे स्टेशन परिसरातील पुरसदृश्य नियंत्रणात येणार आहे.

महापालिकेच्या एफ उत्तर विभागातील वडाळा रेल्वे स्थानकाचा परिसर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परिक्षेत्रात मोडत असून या भागातील पावसाळी जलवाहिन्या मुसळधार पावसात तुडुंब भरुन वाहतात. परिणामी वडाळा स्थानकाच्या दोन्ही बाजुला तसेच किडवाई मार्गावर पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून या निविदेमध्ये विरल असोशिएट्स ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा उणे १९ टक्के दर लावून हे काम मिळवले असून या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यासाठी ३७.६७ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यामध्ये ढापा ड्रेनचे रुपांतर, विद्यमान पाईप ड्रेन्सचे विस्तारीकरण तसेच आकारमान वाढवण्यात येणार आहे.

(हेही वाचा Aurangzeb : एमआयएमचे पुन्हा उफाळून आले औरंग्यावरील प्रेम; शहराध्यक्ष फोटो घेऊन नाचला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.