मुंबई महापालिकेच्या अत्यंत खडतर असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले असले तरी प्रत्यक्षात १०० पावलांच्या अंतरा एवढ्या पादचारी पुल पूर्ण होण्यास तब्बल पाच वर्षांचा कालावधी लागत आहे. माटुंगा पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरील रुपारेल कॉलेजला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम आजतागायत अपूर्णच आहे. मार्च २०१९मध्ये माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानक ते रुपारेल कॉलेज या पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली, परंतु या पुलाचे बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. (Senapati Bapat Marg FOB)
पश्चिम रेल्वेवरील माटुंगा रेल्वे स्थानक ते रुपारेल कॉलेज या सेनापती बापट मार्ग ओलाडून जाणाऱ्या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने लँडमार्क कार्पोरेशन या कंपनीची निवड करून त्यांना १६ मार्च २०१९ रोजी कार्यादेश देण्यात आला होता. परंतु याचे काम पुन्हा मुदत दिलेल्या १६ फेब्रुवारी २०२४ची तारीख जवळ आली तरी या पुलाचे काम केवळ ५० टक्केच पूर्ण झालेले आहे. या पुलाचा फायदा रुपारेल कॉलेजमधील विद्यार्थी वर्गाला होणार आहे. परंतु पाच वर्ष पूर्ण होत आली तरी या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आजही रुपारेल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तुळशी पाईप रोड अर्थात सेनापती बापट मार्ग ओलांडून कॉलेज गाठावे लागते. विशेष म्हणजे या मार्गावर भरघाव वेगाने वाहने जात असतात तसेच बऱ्याचदा वाहतूक कोंडीमुळे हा रस्ता ओलांडणे हेही कठिण जात आहे. (Senapati Bapat Marg FOB)
(हेही वाचा – FASTag : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अनुभव उत्तम करण्यासाठी ‘एक वाहन एक फास्टॅग’ उपक्रमाचा आरंभ)
माजी मुख्यमंत्री प्रिं. मनोहर जोशी हे खासदार असताना तत्कालिन माहिममधील नगरसेवक प्रकाश आयरे यांच्या शाखेत आयोजित जनता दरबारमध्ये तत्कालिन शाखाप्रमुख दिपक साने यांच्यासह शिवसैनिकांनी माटुंगा रेल्वे स्थानक ते रुपारेल कॉलेज आणि माटुंगा स्थानक ते पश्चिम रेल्वे वसाहत अशाप्रकारे रेल्वे पादचारी पूल बांधण्याची मागणी केली होती. या पुलाच्या बांधकामाबाबतचा आराखडा त्यानंतर मनोहर जोशी यांचे स्वीय सहायक असलेल्या सु. ना. जोशी यांनी मागवून घेत या पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा केला. परंतु प्रत्यक्षात माटुंगा स्थानकावरुन सेनापती बापट मार्गावरील पादचारी पुल बांधण्यात आले. परंतु या पुलाचा फायदा प्रत्यक्षात पश्चिम रेल्वे वसाहतीतील नागरिकांना होऊ शकला ना रुपारेल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना. त्यामुळे सेनापती बापट मार्ग पार करणारे पादचारी पुल बांधण्याचा पाठपुरावा पुन्हा सुरु झाला आणि त्यानुसार महापालिकेच्या पूल विभागाने पादचारी पूल बांधणीचा आराखडा तयार करत यासाठी निविदा मागवली. (Senapati Bapat Marg FOB)
या पुलाच्या बांधकामासाठी लँडमार्क कॉर्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली. त्यानुसार, या कंपनीला मार्च २०१९मध्ये कार्यादेश देण्यात आला. परंतु कोविड काळाचे कारण देत या कंपनीला मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला तरी या पुलाचे बांधकाम आजही रखडलेलेच आहे. या पूलाचे बांधकाम सहा महिन्यांच्या कालावधीत य पुलाचे बांधकाम होणे अपेक्षित असताना त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणे हेच मुळात महापालिकेचे मोठे अपयश असून महापालिकेने या कंपनीला वाढीव कालावधी देऊनही कंपनीला या पुलाचे बांधकाम पूर्ण करता आलेले नाही. मात्र या पुलाचे बांधकाम आजही अर्धवट राहिलेले असतानाही महापालिका प्रशासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन हे कंत्राटदारांसाठी काम करते की जनतेसाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Senapati Bapat Marg FOB)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community