-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील फेरीवाल्यांनी आधीच पदपथ आणि रस्ते अडवलेले असले तरी प्रत्यक्षात आता दुकानदारांकडूनही वाढीव बांधकाम केले जात आहे. दुकानांच्या शटरच्या पुढे नावाच्या फलकाचे वाढीव बांधकाम करून त्या आधारे दुकाने थेट पदपथापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजोय मेहता महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी दुकानांच्या वाढीव बांधकामाविरोधात धडक कारवाईची मोहिम हाती घेतली होती, परंतु मेहता गेल्यानंतर दुकानांच्या वाढीव बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असून दुकानांच्या वाढीव बांधकामामुळे पदपथांची रुंदी कमी झालेली पहायला मिळत आहे. (BMC)
सन २०१६मध्ये तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दुकानांच्या छपरासह पदपथावर वाढीव बांधकाम करत उभारलेल्या पायऱ्यांची अतिक्रमणे तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत प्रत्येक वॉर्डात ही यशस्वी कारवाई करण्यात आल्याने अनेक पदपथ अतिक्रमण मुक्त झाली होती. या वाढीव बांधकामामुळे पदपथ मोकळे करून दिले जात असतानाच काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे ही कारवाई संथ झाली. (BMC)
(हेही वाचा – Fire : विमानतळावरील फेअरमाँट हॉटेलमध्ये आग; ८० नागरिकांची सुखरूप सुटका)
परंतु, पुन्हा आता दुकानांच्या छपरांचे वाढीव बांधकाम शटरपासून चार ते पाच फुट पुढे करून त्या दुकानांच्या छपराच्या या वाढीव बांधकामाच्या आधारे लटकंती आणि कपड्यांच्या प्रदर्शनासाठीचे पुतळे लावून पदपथ पूर्णपणे अडवले जातात. त्यामुळे पदपथाची रुंदीची कमी होत असून पदपथावर आधीच फेरीवाले निम्मी जागा अडवून बसतात. आणि दुसरीकडे दुकांनांनीही वाढीव बांधकाम करत आपले साहित्य पदपथावर ठेवल्याने लोकांना चालण्यास केवळ दोन ते अडीच फूट एवढीच जागा शिल्लक राहते. त्यामुळे बऱ्याचदा पादचाऱ्यांना धक्काबुक्की होऊन हाणामारीवर प्रकरण येते. (BMC)
आज फेरीवाले रस्त्यासह पदपथावरही अतिक्रमण करत असतानाच दुकानदारांकडूनही अतिक्रमण होत असतानाही महापालिका प्रशासनाकडून यावर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन फेरीवाल्यांसह दुकानदांरच्या वाढीव बांधकामांवर कधी कारवाई होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community