-
ऋजुता लुकतुके
ओपन एआय कंपनीने अलीकडेच आपल्या ग्राहकांना ॲनिमेटेड इमेज जनरेशनची सुविधा उपलब्ध करून दिली. तुम्ही एखादा फोटो चॅट जीपीटीवर टाकलात तर गिबली स्टुडिओ आर्टच्या मदतीने हे सॉफ्टवेअर क्षणार्धात तुम्हाला तुमचा ॲनिमेटेड फोटो बनवून देतं. ही सुविधा सुरुवातीला चॅट जीपीटीने मोफत देऊ केली आहे. कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ट्विट करून यासंबंधीची घोषणा नुकतीच केली आहे. त्यानंतर या नवीन फिचरमुळे एका तासांतच चॅट जीपीटीने १० लाख नवीन ग्राहक जोडल्याची माहिती खुद्द ऑल्टमन यांनी आता दिली आहे. (The Ghibli Effect)
‘२६ महिन्यांपूर्वी चॅट जीपीटी लाँच झालं होतं. या दिवसांतील एक थरारक आणि मजेशीर अनुभव आम्ही अलीकडे घेतला. एका तासांत चॅट जीपीटीवर १० लाख नवीन लोक आले. त्यांनी आमचं सदस्यत्व स्वीकारलं आहे. हे अर्थातच इमेज जनरेशन सॉफ्टवेअरमुळे घडलं आहे,’ असं ऑल्टमन यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. (The Ghibli Effect)
(हेही वाचा – मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवेल, सकाळचा भोंगा नाही; Chandrashekhar Bawankule यांचा राऊतांना टोला)
It’s been 24 hours since OpenAI unexpectedly shook the AI image world with 4o image generation.
Here are the 14 most mindblowing examples so far (100% AI-generated):
1. Studio ghibli style memespic.twitter.com/E38mBnPnQh
— Barsee 🐶 (@heyBarsee) March 26, 2025
सॅम ऑल्टमन यांनी आपल्या प्रोफाईलवरही गिबली आर्टने बनवलेला ॲनिमेटेड चेहरा ठेवला आहे. या सॉफ्टवेअरचा व्यावसायिक वापरही शक्य आहे. कारण, तुम्हाला हव्या तशा इमेज हे सॉफ्टवेअर बनवून देऊ शकतं. सुरुवातीला ओपन एआयने फक्त पेड ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. पण, प्रो ग्राहकांनी हे फिचर उचलून धरल्यावर ओपन एआय कंपनीने ते सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. (The Ghibli Effect)
२९ मार्चला हे फिचर सुरू झालं होतं आणि आता ते सगळ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर गिबली स्टुडिओच्या स्टाईलमध्ये बनवलेली चित्र पोस्ट करण्याचा सपाटा लागला आहे. अनेकांनी जाहिरातींमध्ये त्याचा वापर केला आहे. सध्या ओपन एआयने फ्री ग्राहकांना एका दिवसांत फक्त ३ इमेजेसचं बंधन धातलं आहे. तर पेड ग्राहक त्यांच्या प्लाननुसार, जास्त इमेज तयार करू शकतात. (The Ghibli Effect)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community