तिने दात घासायला घेतले आणि मोरीतच कोसळली! असे काय घडले तिच्यासोबत?

१८ वर्षांची अफसाना धारावीतील एका चाळीत आई, मोठी बहीण आणि दोन भावांसह राहत होती.

१८ वर्षांची अफसाना सकाळी डोळे चोळतच मोरीत गेली, तिने टूथ ब्रशला पेस्ट लावली आणि दात घासत असतांना अचानक कोसळली. कुटुंबियांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र रात्री उशिरा तिची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी सांगितले की, विष तिच्या संपूर्ण शरीरात पसरले होते.

टूथपेस्ट म्हणून तिने उंदीर मारण्याच्या औषधाने घासले दात!

१८ वर्षांची अफसाना धारावीतील एका चाळीत आई, मोठी बहीण आणि दोन भावांसह राहत होती. आई फळ विक्री करून कुटुंब चालवत चालवते, तर अफसानाची मोठी बहीण ही छोटी मोठी नोकरी करून आईला हातभार लावते, अफसाना मात्र शिक्षण घेत होती. रविवारी सकाळी ७ वाजता अफसाना झोपेतून जागी झाली आणि ब्रश करण्यासाठी मोरीत गेली, तिने ब्रशला टूथ पेस्ट समजून उंदीर मारण्याची पेस्ट लावली, पेस्टची चव आणि वास वेगळा येऊ लागल्यावर आपण टूथपेस्ट ऐवजी चूकुन उंदीर मारण्याच्या पेस्टने दात घासले, असे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने लगेच चूळ भरली, मात्र तोवर उशीर झाला होता, चूळ भरत असतांना ती मोरीत कोसळली. कुटुंबियांनी तिला ताबडतोब जे.जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असताना रविवारी रात्री तिचा मृत्यु झाला. सर्वांगात विष पसरल्यामुळे तिचा मृत्यु झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी धारावी पोलिसांनी अपमृत्यु अशी नोंद केली.

(हेही वाचा : काँग्रेसचा खोडसाळपणा! वीर सावरकरांचा पुन्हा केला अवमान!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here