कोरोना महामारीमुळे मागच्या दोन वर्षांत शेकडो लोकांचे जीव गेले, अनेक संसार उद्धवस्त झाले, अनेकजण अनाथ झाले. कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. अशातच वैज्ञानिकांनी आणखी एका महामारीचा इशारा दिला आहे. हिमनदी वितळल्यामुळे जगाला पुन्हा एकदा महामारीचा सामना करावा लागेल, असे अभ्यासातून समोर आले आहे.
हिमनदी वितळली तर, नदीखाली असलेले अनेक प्राचीन बॅक्टेरिया आणि विषाणू बाहेर येतील आणि बाहेर आल्यानंतर जगभरात मोठी महामारी येऊ शकते. हिमनदीच्या खाली असलेल्या विषाणूमुळे सर्वात आधी जलचर प्राणी संक्रमीत होतील. त्यानंतर अन्य जीव आणि माणसांमध्ये या विषाणूचा प्रसार होऊ शकतो.
( हेही वाचा: T-20 विश्वचषकातील भारत – पाकिस्तान सामना होणार नाही? ‘हे’ आहे कारण )
इबोला आणि इन्फ्लूएंझा यापेक्षा भयानक महामारी पसरेल
जागतिक तापमान वाढ आणि बदलत्या हवामानामुळे हिमनद्या वितळत आहेत. या हिमनदीच्या खाली हजारो वर्षांपासून बॅक्टेरिया आणि विषाणू दडलेले आहेत. हे विषाणू तिथेच प्रजनन करत पिढ्या वाढवत आहेत. त्यामुळे इथून निघणा-या विषाणूमुळे इबोला आणि इन्फ्लूएंझा यापेक्षा भयानक महामारी पसरेल. हिमनदी वितळल्यानंतर विषाणू आणि बॅक्टेरिया बाहेर येतील आणि आपल्यासाठी नवीन होस्ट शोधतील, ज्यावर ते जगू शकतात आणि आपली पिढी वाढवू शकतात. जसं सध्या कोरोना विषाणू मानवी शरीरात करत आहे. आपली पिढी वाढवण्यासाठी नवनवीन व्हेरियांटच्या रुपात बाहेर येत आहेत.