शांती, सौहार्दाशिवाय विकसित राष्ट्राचे ध्येय गाठता येणार नाही; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांचे प्रतिपादन

47
शांती, सौहार्दाशिवाय विकसित राष्ट्राचे ध्येय गाठता येणार नाही; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांचे प्रतिपादन

समाजात शांती व सौहार्दयाचे वातावरण असल्याशिवाय विकसित राष्ट्राचे ध्येय गाठता येणार नाही असे सांगून सर्वधर्म संवादामुळे परस्परांविषयी असलेले पूर्वग्रह दूर होण्यास व समाजासमाजातील दुही मिटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी केले.

पु. ल. देशपांडे अकादमी, मुंबई येथे लोकमत माध्यम समूह आणि अहिंसा विश्व भारती यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर जयंतीचे औचित्य साधून ‘सर्व धर्मीय संवादाच्या माध्यमातून जागतिक शांतता व सौहार्द’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

(हेही वाचा – ऐन उन्हाळ्यात Western Railway मालामाल; वातानुकूलित रेल्वेमुळे तिजोरीत भर)

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) म्हणाले की, सर्वशक्तिमान परमात्म्यासमोर सर्व धर्म सामान आहेत. त्यामुळे आपण सर्व धर्म व प्रार्थना पद्धतीचा आदर केला पाहिजे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून राज्यातील संतांनी वेदांचे ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवले आहे. भारताने अनादी काळापासून सर्व धर्मांचे स्वागत केले. भारतात चार धर्मांचा जन्म झाला व देशात पारशी, ज्यू, मुस्लिम यांपैकी कुणालाही धर्मावरून दुजाभावाची वागणूक दिली गेली नाही असे राज्यपालांनी सांगितले.

नव्या पिढींना बहुधर्मीय व बहू सांस्कृतिक समाजात राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना सर्व धर्मांचा व पंथांचा आदर करण्यास शिकवणे आवश्यक आहे. या दृष्टीने शाळा व महाविद्यालयांनी सर्व धर्मांचे सण साजरे केले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांच्या विविध धर्मियांच्या प्रार्थना स्थळांच्या भेटींचे आयोजन केले पाहिजे, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.