दुसरी Tanisha Bhise होऊ नये यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

राज्यात बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना, आयुष्मान भारत मिशन, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अशा अनेक योजना असतानाही रुग्णालये मात्र रुग्णांकडून 'आम्हाला या योजनांचा लाभ नको', असे लिहून घेत त्यांच्याकडून भरमसाठ पैसा उकळतात.

40

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशाअभावी रुग्णालयाने उपचार नाकारल्याने तनिषा भिसे या गर्भवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय पातळीवर खळबळ उडाली, मात्र यानंतर सरकार आता सक्रिय झाले आहे. अशा प्रकारे पुनः Tanisha Bhise कुणी होवू नये म्हणून सरकारने कठोर पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. यासाठी राज्यभरातील 2031 धर्मादाय रुग्णालयांना थेट कडक शब्दांत पत्र पाठवण्यात आले आहे.

(हेही वाचा ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन Waqf Act 1995 ला देणार आव्हान; मागील ७० वर्षांत वक्फ बोर्डाने हडपलेल्या जमिनीही उघडकीस येणार?)

राज्यात बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना, आयुष्मान भारत मिशन, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अशा अनेक योजना असतानाही रुग्णालये मात्र रुग्णांकडून ‘आम्हाला या योजनांचा लाभ नको’, असे लिहून घेत त्यांच्याकडून भरमसाठ पैसा उकळतात. याविषयीच्या अनेक तक्रारी आता पुढे आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा रुग्णालये गैरफायदा घेतात. त्यामुळे सरकारने आता Tanisha Bhise प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सरकारने मोफत उपचाराच्या योजनांची व्याप्ती वाढवणे आणि त्याचा गरजू रुग्णांना फायदा करून देण्यासंदर्भात विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. या रुग्णालयांनी रुग्ण लुटारी वर्तवणूक त्वरित थांबवावी. रुग्णालयांची प्रतिमा डागाळू नये, सर्वसामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचाराअभावी जिवाला मुकू नये, अशा स्पष्ट सूचना असणारे पत्र आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीने राज्यातील २०३१ रुग्णालयांना दिले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.