CM Eknath Shinde : भटक्या – विमुक्त समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री

132
भटक्या व विमुक्त समाजाच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भटक्या- विमुक्त समाजाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक विधानभवन येथे झाली.
बैठकीला इतर मागास व बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भटके- विमुक्त समाजाच्या प्रतिनिधींमार्फत विविध प्रश्न मांडण्यात आले. यात शैक्षणिक प्रश्न, घरांची उपलब्धता यासह भटके- विमुक्त समाजातील लोककलावंतांच्या अडचणींची माहिती देण्यात आली. महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या लोककला जोपासणाऱ्या लोककलावंताना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधन ५ हजार करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, तसेच लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी समाजाच्या प्रतिनिधींना दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.