मागच्या काही दिवसांपासून बॅंकिंग क्षेत्राशी संबंधित बरेच मोठे निर्णय घेतले जात आहेत. या निर्णयांपैकी एक म्हणजे बॅंकांच्या खासगीकरणाचा. सध्याच्या घडीला बॅंकांच्या खासगीकरणाशी संबंधित एक नवी माहिती समोर आली आहे. ज्यात आणखी एक बॅंक सरकारकडून खासगी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
ही बॅंक होणार खासगी
सध्या सरकारकडून काही बॅंकांमध्ये असणारी भागीदारी विकण्यात येत आहे. यातच आता IDBI Bank सुद्धा Privatisation च्या यादीत आली आहे. 7 जानेवारीपर्यंत, म्हणजेच आठवड्याभराहूनही कमी वेळात ही बॅंक पूर्णपणे खासगी करण्यात येणार आहे.
सरकारतर्फे IDBI बॅंकेसाठी प्रारंभिक तत्वावर बोली लावल्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. ही मुदत आता 7 जानेवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र शासन आणि LIC आयडीबीआय बॅंकेशी असणारी त्यांनी 60.72 टक्के भागीदारी विकू इच्छितात. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच यासाठी इच्छुक खरेदीदारांनी बोली लावण्याचे आवाहन बॅंकांकडून करण्यात आले होते.
( हेही वाचा: राज्यभरातील सात हजार निवासी डाॅक्टर संपावर; रुग्णांचे हाल )
‘या’ बॅंकाचेही होणार Privatisation ?
या यादीत केवळ IDBI च नव्हे, तर सरकारकडून खासगीकरणासाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया आणि इंडियन ओवरसीज बॅंक यांची नावेही पुढे आल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे येत्या काळात ओवरसीज बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे खासगीकरण होऊ शकते.
Join Our WhatsApp Community