- प्रतिनिधी
कौशल्य विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणाऱ्या ‘दक्ष’ (डेव्हलपमेंट अंडर अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र) या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून गतीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिली.
शुक्रवारी मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनात ‘दक्ष’ प्रकल्पाबाबत जागतिक बँकेच्या प्रतिनिधींशी बैठक झाली. या वेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, जागतिक बँकेचे भारत पथक प्रमुख प्रद्युम्न भट्टाचार्य, वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ डेनिस निकोलेव्ह आदी उपस्थित होते.
(हेही वाचा – Shiv Sena UBT कडून शिवसेनेत भांडणे लावण्याचा प्रयत्न!)
‘दक्ष’ प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
‘दक्ष’ प्रकल्पाच्या माध्यमातून कौशल्य विकासाच्या सर्व विभागांना एकत्र आणून जागतिक दर्जाचे कुशल मनुष्यबळ तयार केले जाणार आहे. या प्रकल्पातून महिलांसह समाजातील प्रत्येक घटकाला उद्योगांच्या मागणीप्रमाणे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जागतिक कौशल्य केंद्र आणि नाविन्यता नगर वसविण्यावरही बैठकीत चर्चा झाली. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ४५ मनुष्यबळाची त्वरित मंजुरी, संकेतस्थळ अद्ययावत करणे, तसेच सर्व विभागांचा समन्वय साधणे यावर भर देण्यात आला. (Mangal Prabhat Lodha)
कौशल्य विकास विभागाला गती देणारा ‘दक्ष’ प्रकल्प हा देशातील एक उत्कृष्ट प्रकल्प ठरेल, असा विश्वास जागतिक बँकेचे पथक प्रमुख प्रद्युम्न भट्टाचार्य यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community