उशिराने दाखल झालेल्या पावसाने दिल्ली , पंजाब, जम्मू काश्मीरसह उत्तर भारतात कहर मांडला आहे. राजधानी दिल्लीच्या अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून प्रत्येक पावसात पाण्याखाली जाणारा मिंटो ब्रिज देखील बुडाला आहे. यामुळे पुल वाहतुकीसाठी बंद करण्य़ात आला आहे. यातच खासदारांच्या बंगल्यांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले आहे.
खान मार्केटमध्ये देखील पाणी शिरले आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. जुन्या लोखंडी पुलाजवळ यमुना धोक्याच्या पातळीच्या काही मीटर खालून वाहत आहे. मंगळवारी यमुना 205.33 मीटर धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी 1 वाजता जुन्या रेल्वे पुलावर यमुनेची पाण्याची पातळी 203.18 मीटर होती. इशारा पातळी 204.5 मीटर आहे, असे केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे. नरेला, अलीपूर, रोहिणी, पितामपुरा, पश्चिम विहार, पंजाबी बाग, कश्मीरी गेट, सीलमपूर, राजौरी गार्डन, लाल किल्ला, राजीव चौक, आयटीओ नजफगड, द्वारका, इंडिया गेट, लोधी रोड, अक्षरधाम, पालम, आयजीआय विमानतळ यांसारखे राजधानीचे क्षेत्रात पाणी साचले आहे. दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्येही पुरसदृष्य स्थिती आहे. पंजाबमध्येही चंदीडढचा सुखना तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनालीमध्येही पावसाने कहर केला आहे. चाळीस वर्षे जुना पूल वाहून गेला आहे. तसेच नदीच्या बाजुची दुकाने, एटीम आदी देखील वाहून गेले आहे. कसोल भागातील बियास नदीत कार वाहुन गेल्या आहेत. “
(हेही वाचा Khalistani : लंडनमध्येही खलिस्तानींचा भारतीय उच्चायुक्तालयाला टार्गेट करण्याचा प्रयत्न)
Join Our WhatsApp Community