Goregaon Film City Road : गोरेगावमधील फिल्मसिटी मार्गावर पुन्हा वाढले फेरीवाले, मे महिन्यात घडला होता तो प्रकार

922
Goregaon Film City Road : गोरेगावमधील फिल्मसिटी मार्गावर पुन्हा वाढले फेरीवाले, मे महिन्यात घडला होता तो प्रकार

गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटी मार्ग, पंकज शाह मार्गावर असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्याकडील शोरमा खाल्याने अनेकांचा याची विषबाधा होऊन त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मे महिन्यात घडल्यानंतर येथील सर्व फेरीवाल्यांवर महापालिकेने कडक कारवाई केली होती. परंतु आता याच परिसरात पुन्हा एकदा फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या स्टॉल्स मोठ्याप्रमाणात लागल्याने स्थानिक गृहनिर्माण सोसायट्यांमधून आता चिंता व्यक्त केली जात आहे. या फेरीवाल्यांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात नसल्याने पुन्हा कुणाचा बळी जावा अशी महापालिका प्रशासनाची इच्छा आहे का असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांना महापालिका कारवाई कधी करणार या चिंतेत स्थानिक रहिवाशी आहेत. (Goregaon Film City Road)

गोरेगाव पूर्व येथील चित्रनगरी रोडवरील पंकज शाह मार्गावरील सॅटेलाईन गार्डन हाऊसिंग सोसायटी (फेज तीन)च्या नागरिकांनी महापालिकेसह पोलिस आणि अग्निशमन दलाला निवेदन देऊन या भागातील फेरीवाल्यांच्या वाढत्या समस्येबाबत चिंता तसेच भीती व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. या भागात दोन महिन्यांपूर्वी शोरमा खाल्याने अनेकांना विषबाधा झाला होता. या विषबाधेनंतर एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेने येथील सर्व फेरीवाले व खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केलो होती. मागील काही दिवसांपासून सुरु असलेली ही कारवाई थांबल्यानंतर पुन्हा त्याठिकाणी फेरीवाल्यांनी रस्त्यांसह मोकळ्या जागा अडवून व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. (Goregaon Film City Road)

(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग नको!)

नागरिकांना करावा लागतो अडचणींचा सामना 

या परिसरात पुन्हा एकदा फेरीवाले आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढू लागली असून या सर्वांवर त्वरीत कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे. या फेरीवाले व खाद्य पदार्थ विक्रेत्यांमुळे येथील लोकांना चालताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडीही होत असते, असे त्यांनी आपल्या निवेदनात नमुद केले. त्यामुळे या फेरीवाल्यांमुळे येथील रहिवाशांचे जिणे अवघड होऊन बसले आहे. या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे अनधिकृत एलपीजी सिलिंडरचा वापर केला जातो. महापालिकेच्यावतीने खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे जाहीर करत कारवाई हाती घेतली. परंतु प्रत्यक्षात विषबाधेचा प्रकार झालेला असतानाही तसेच वाहतूक कोंडी होत असतानाही या भागातील फेरीवाल्यांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात नाही याची खंत येथील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. (Goregaon Film City Road)

याबाबत भाजपाच्या माजी नगरसेविका प्रीती सातम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येथील सॅटेलाईन गार्डन हाऊसिंग सोसायटी (फेज तीन) च्या सोसायटीने मलाही याबाबतचे निवेदन दिले असून येथील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येबाबत चिंता व्यक्त करत कारवाईची मागणी केली. त्यानुसार, महापालिकेच्या आपण पत्र लिहून येथील फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल अशी घोषणा केली होती, परंतु या घोषणेनंतरच हे फेरीवाले आणि खाद्यपदार्थ पुन्हा रस्त्यावर आल्याने आपल्या कारवाईबाबत लोकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे आणि तसेच रहिवाशांकडून माझ्याकडे बोलले जात आहे. त्यामुळे याठिकाणी तातडीने कारवाई करून हा परिसर फेरीवालामुक्त करण्यात यावा आणि रहिवाशांची अडचण दूर करण्यात यावी अशी मागणी सातम यांनी प्रशासनाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. (Goregaon Film City Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.