Dadar : दादरचे हॉकर्स प्लाझा बनलेय आता महापालिकेचे कार्यालय

227
Dadar Hawkers Plaza इमारतीची अखेर दुरुस्ती

दादरमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी युती सरकारच्या काळात बांधण्यात आलेल्या हॉकर्स प्लाझा इमारत आता महापालिकेचे कार्यालय म्हणून ओळखले जात आहे. या हॉकर्स प्लाझामध्ये दोन मजल्यांवर काही दुकानदारांना गाळे दिले असून उर्वरीत मजल्यावर महापालिकेच्या विविध विभागाची कार्यालये थाटली गेली आहेत. आता उद्यान कक्षाचे कार्यालयही या हॉकर्स प्लाझामध्ये येणार आहे.

दादरमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या संकल्पनेतून दादरमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील मंडई शेजारील जागेत पाच मजली हॉकर्स प्लाझा इमारत बांधली. त्यातील तळ अधिक तीन मजल्यावरील ८६५ गाळे राखीव ठेवून त्यातील दोने मजल्यांवरील काही गाळे पात्र फेरीवाल्यांचे तसेच परवानाधारक फेरीवाल्यांना वितरीत करण्यात आले आहेत. हॉकर्स प्लाझाची बांधणी सन २००० मध्ये ३० कोटी रुपये खर्च करून केली होती. त्यानंतर मागील वर्षी या इमारतीच्या डागडुजीसह इतर कामांसह ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

या इमारतीमध्ये काही वर्षांपूर्वी चौथ्या मजल्यावर लेखा परिक्षण विभागाची कार्यालये स्थलांतरीत करण्यात आली आहे. तर सहाव्या मजल्यावर एलफिन्स्टन रोडवरील नियोजन विभागाचे कार्यालय हॉकर्स प्लाझामध्ये हलवण्यात आले, त्यानंतर ग्रॅटरोड येथील किटकनाशक विभागाचे कार्यालयही याच इमारतीत आणण्यात आले. तर पाचव्या मजल्यावर यापूर्वीच दुकाने व आस्थापने विभागाचे कार्यालय होते. आता या इमारतीत आणखी एका कार्यालयाची भर पडणार आहे, ती म्हणजे उद्यान कक्षाची. भायखळा येथील उद्यान कक्षाचे कार्यालय आता हॉकर्स प्लाझा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्थलांतरीत करण्यात येत आहे.

(हेही वाचा – जमिनीवर रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याची गरज : डॉ. मनसुख मांडवीय)

या चौथ्या मजल्यावर उद्यान पायाभूत कक्ष विभागाचे कार्यालय बनवण्यासाठी या जागेची नुतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये लादीकाम, कारपेट बसवणे, खिडक्या, रंगकाम, फॉल सिलिंग, फर्निचरसह विद्युतची कामे करण्यात येणार आहे. शिवाय अग्निशमन यंत्रणा, एचव्हीएसी यंत्रणा आदी कामे केली जाणार आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित असून यावर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी हिरेन अँड कंपनीची निवड करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.