Rashmi Shukla प्रकरणातील याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाने का सुनावले खडेबोल?

85
Rashmi Shukla प्रकरणातील याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाने का सुनावले खडेबोल?
  • प्रतिनिधी 

राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणीस नकार दिला आहे. तसेच या गोष्टीचे राजकारण करू नका असे खडेबोल याचिकाकर्त्यांना न्यायालयाने सुनावले आहे.

(हेही वाचा – मतदानाच्या दोन दिवसआधी काँग्रेसने मुसलमानांना चुचकारले; Muslim Reservation चे दाखवले आमिष )

जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना ऐन निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून काढून त्यांच्या जागी पोलीस महासंचालक म्हणून संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीनंतर रश्मी शुक्ला या पुन्हा महासंचालक पदावर येतील म्हणून काँग्रेसने रश्मी शुक्ला यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2024 : ३ दिवसांच्या सराव सामन्यात काय काय घडलं?)

शुक्ला (Rashmi Shukla) यांना पुन्हा सेवेत न घेता संजय वर्मा यांना पोलीस महासंचालक म्हणून कायम करावं असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. रश्मी शुक्ला या निवृत्त आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून हटवल्यानंतर सक्तीच्या रजेवर पाठवता येणार नाही. त्यांना निवृत्त घोषित करावं अशी मागणी काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेत केले होते. या याचिकेची तातडीने करण्यात यावी अशी विनंती उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने सोमवारी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला असून या गोष्टीचे राजकारण करू नका असे खडेबोल याचिकाकर्ते यांना सुनावले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.