राज्यातील चेक पोस्ट होणार बंद ?

परिवहन विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर, राज्य सरकारने मोठे पाऊल उचलेले आहे. त्यासंदर्भात गृहविभागाने परिवहन विभागाला पत्र पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील चेक पोस्ट बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अहवाल सादर केला जावा

राज्यातील चेक पोस्टचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील 3 महिन्यांत हा अहवाल सादर करण्याच्या सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत. राज्यातील चेक पोस्ट जर का बंद झाले तर काय परिणाम होतील? त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा देखील अभ्यास होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सीमा तपासणी नाके बंद करण्याची कार्यपद्दती काय असावी चेकपोस्ट बंद केल्याने राज्य सरकारवर काय आर्थिक बोजा पडेल याचा अभ्यास होणार आहे.

( हेही वाचा: पेट्रोल वाचवण्याच्या या भन्नाट टिप्स तुम्हाला माहिती आहेत का? )

…नंतर निर्णय घेतला जाणार

रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या निर्देशानंतर चेक पोस्ट बंद करण्याबाबत अभ्यास गट तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा अभ्यास गट चेक पोस्ट बंद केले तर त्याचे परिणाम काय होणार तसेच, त्यांच्या उपाययोजनांबाबत अभ्यास करुन एक रिपोर्ट तयार करण्यात येईल, ज्यानंतर चेक पोस्ट बंद करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here