कोरोना निर्बंध हटवण्यात आल्यानंतर हॉटेल व्यवसायिकांना अच्छे दिन येताना दिसत आहेत. कोरोना काळाच्या तुलनेत आता हॉटेल व्यवसाय जवळपास साठ टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्याचसोबतच उन्हाळ्याच्या सुट्यांनादेखील सुरुवात झाल्याने पर्यटनातही वाढ झालेली आहे याचा फायदा हॉटेल्सना व्यवसायिकांना झाला आहे.
( हेही वाचा : रविवारी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक )
ग्राहक संख्येत वाढ
काही महिन्यांपूर्वी ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला होता. त्या काळात हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत जवळपास चाळीस टक्क्यांची घट झाली होती. मात्र, आता हळूहळू स्थिती बदलत असून, ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात ग्राहकांची संख्या 40 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर पोहोचली. तर मार्चमध्ये ग्राहकांच्या संख्येत 61 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. हॉटेल व्यवसाय हा कोरोनापूर्व काळाप्रमाणे सुरू झाला असल्याचे हॉटेल मालकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, असे असले तरीदेखील नफ्यात मात्र मोठी घट झाली आहे. सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अन्न-धान्य व भाजीपाल्यांच्या किमती देखील महाग झाल्या आहेत. महागाई ज्या प्रमाणात वाढली त्या प्रमाणात मात्र अद्याप हॉटेलिंगचे दर वाढले नाहीत. त्यामुळे नफ्यातील मार्जीन कमी झाले आहे, असे हॉटेल व्यवसासिकांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community