BMC : माहुलमधील प्रकल्प बाधितांची घरे महापालिकेच्या तृत्तीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांना विकत घेता येणार

45
BMC : माहुलमधील प्रकल्प बाधितांची घरे महापालिकेच्या तृत्तीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांना विकत घेता येणार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या ताब्यात असलेल्या प्रकल्पबाधितांच्या सदनिकांमध्ये कुणीही प्रकल्पबाधित जायला तयार नसल्याने आता सदनिका प्रशासनाने विक्रीला काढल्या असून माहुलमधील या सर्व सदनिकांची कामगारांना विक्री करण्यासाठी महापालिकेने जाहीर केली असून येत्या १५ मार्च २०२५ पासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात होणार आहे. या सदनिकांचा लाभ चतुर्थ श्रेणी आणि तृत्तीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना होणार आहे. (BMC)

एमएमआरडीएच्यावतीने बांधलेल्या सदनिका महापालिकेला विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी हस्तांतरीत केल्या आहेत. माहुल आंबा पाडा येथील एवर स्माईल, एस जी केमिकल, व्हिडीओकॉन अतिथी आदी ठिकाणच्या बऱ्याच सदनिक या प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन केल्यानंतर रिक्त आहेत. या सर्व रिक्त सदनिकांची संख्या १३ हजारांच्या आसपासून असून या ठिकाणी कोणीही प्रकल्प बाधित जाण्यास तयार नसल्याने या सदनिका पडून आहेत. या सर्व सदनिकांची विक्री महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना करण्यात येणार आहे. (BMC)

(हेही वाचा – BMC : महापालिका कर्मचाऱ्यांना साडेदहा लाखांमध्ये मालकी हक्काचे घर… तेही मुंबईत!)

याबाबत महापालिका प्रशासनाच्यावतीने जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ही या योजना केवळ महानगरपालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असेल, असे प्रशासनाने नमुद केले आहे. महानगरपालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईमध्ये घर उपलब्ध करून, त्यांच्या प्रवासाचा वेळ कमी करणे आणि कामाची क्षमता वाढवणे हे ही योजना राबवण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे या याजनेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत घर घेण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. (BMC)

या योजनेमध्ये, माहुल, एस. जी. केमिकल व विडीयोकॉन अतिथी येथील एक सदनिका १२.५ लाख रुपये अधिक मुद्रांक व नोंदणी शुल्क व दोन सदनिका २५.०० लाख अधिक मुद्रांक व नोंदणी शुल्क या दराने विकण्याचे नियोजित केले आहे. कर्मचाऱ्यास १ किंवा २ (जोडी) सदनिका विकत घेण्याची मुभा तथा पर्याय असेल. तसेच त्यांनी त्यानुसार अर्जामध्ये नमूद करायचे आहे. त्यामुळे सर्व खाते प्रमुखाने आपल्या आधिपत्याखालील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या योजनेबाबत अवगत करावे तसेच महानगरपालिकाच्या सर्व संघटनेस अवगत करावे, असेही या जाहिरातीत नमुद केले आहे. (BMC)

(हेही वाचा – Mumbai University ने स्वतःच्या नावातच केली चूक; मुंबई ऐवजी लिहिले ‘हे’ नाव )

या घरांच्या सोडत योजनेसाठी १ मार्च २०२५ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून येत्या १५ मार्च २०१५ पासून या सोडतीसाठी संगणकीय व ऍपद्वारे ऑनलाईन अर्जाची सुरुवात केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १५ एप्रिल २०१५ असेल आणि १६ एप्रिल २०२५ रोजी सर्व अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे यासाठीची सोडत २० एप्रिल रोजी काढली जाणार आहे. त्यानंतर यशस्वी अर्जदारांना २० एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीमध्ये अनामत रक्कम भरणे आवश्यक असेल आणि त्यानंतर पुढील महिन्यांत सदनिकाच्या एकूण किमतीचे २५ टक्के किंवा पूर्ण रक्कम भरणे बंधनकारक असेल. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.