बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदौस या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून, या वादळामुळे तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात वाहून येणारे जोरदार वारे आणि बाष्पामुळे राज्यात ९ ते १५ डिसेंबरला पावसाची शक्यता भारतीय वेधशाळेने वर्तवली आहे. मुंबईत सोमवारी हलक्या पावसाची शक्यता असून, राज्यातील बहुतांश भागांत शुक्रवारपासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाला सुरुवात होईल.
कोकणात पालघर वगळता सर्वत्र हलका पाऊस राहील. सिंधुदुर्गात शुक्रवारपासून तर उर्वरित भागांत रविवारपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात होईल. जळगाव, नाशिक, धुळे, अहमदनगला वीकेण्डला हलका पाऊस राहील. विदर्भात शुक्रवारपासून तीन दिवस हलका पाऊस होईल. कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्येही मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे, सातारा आदी मध्य महाराष्ट्रात वीकेण्ड तर मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद येथे शुक्रवारपासून पावसाला सुरुवात होईल. मात्र या भागांतही जोरदार सरी कोसळणार नाहीत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत वीकेण्डला हलक्या पावसासह वरुणराजाची हजेरी लावण्याची शक्यता आहे. या दिवसांत किमान तापमानात तीन ते चार अंशाने वाढ होईल. त्यामुळे थंडीला हलका ब्रेक राहील.
( हेही वाचा: ….म्हणून इलेक्ट्रिक वाहनांवर ‘येथे’ येणार बंदी )
Join Our WhatsApp Community