महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी रविवारी २६ जानेवारी रोजी मुंबई कोस्टल रोडला वांद्रे-वरळी सी लिंकशी (Bandra-Worli Sea Link) जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन केले आणि हा एक मैलाचा दगड असल्याचे म्हटले, जे महानगरासाठी कनेक्टिव्हिटीच्या एका नवीन युगाची सुरुवात करेल. आता मुंबईकर नरिमन पॉइंटवरून अवघ्या १५ मिनिटांत वांद्रे गाठू शकणार आहेत. दक्षिण मुंबई आणि पश्चिम मुंबईला जोडणारा हा रस्ता मुंबईकरांसाठी लाभदायी ठरणार आहे. (Coastal Road)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी (Republic Day) हा मार्ग नागरिकांना समर्पित झाला असून, सोमवार २७ जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. यामध्ये मरीन ड्राईव्ह कडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका, मरीन ड्राईव्ह (Marine Drive) कडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) आणि मंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. ते म्हणाले, कोस्टल रोड प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात सहभागी असलेल्या सर्व बीएमसी अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार आणि बांधकाम कामगारांचे मी कौतुक करतो. तुमच्या समर्पणामुळे आणि कठोर परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे.
(हेही वाचा – ‘कोरोना विषाणू नैसर्गिक नव्हता तर …’ , Donald Trump सत्तेवर येताच CIA चा चीनवर निशाणा)
काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये?
– धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता दक्षिण या मार्गाचे लोकार्पण झाले. यामुळे मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार.
– मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठी आंतरमार्गिका सुरू होणार. मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका सुरू होणार. बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका देखील सुरू होणार.
– वाहतूक स्थिती : १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ५० लाख वाहनांचा प्रवास तर दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास.- धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई किनारा रस्ता प्रकल्प व वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणारा पुल. या पुलाची एकूण लांबी ८२७ मीटर असून वजन २४०० मेट्रीक टन इतके आहे. हा प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. आजतागायत या प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
(हेही वाचा – Pune Viral Video : पुण्यातील बेरोजगारीचा विदारक व्हिडीओ व्हायरल ; नोकरी मिळवण्यासाठी ३००० उमेदवार रांगेत)
– प्रकल्पाचे फायदे : वेळेची सुमारे ७० टक्के बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत. याचे फलित म्हणून परकीय चलनाचीही बचत. ध्वनी प्रदूषण व वायुप्रदूषणात घट होण्यास मदत. ७० हेक्टर हरित क्षेत्राची निर्मिती. मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह साकारण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना नवीन विहारक्षेत्र लाभणार. या प्रकल्पात सागरी संरक्षण भिंतीची उभारणी. यामुळे किनाऱ्याची धूप होणार नाही आणि समुद्राच्या उंच लाटांपासून प्रकल्पाचे संरक्षण होईल.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community