गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या IFFI 2022 अर्थात ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चा निरोप समारंभ सोमवार, २८ नोव्हेंबर रोजी झाला. मात्र, हा निरोप समारंभ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या समारंभात बोलताना मुख्य ज्युरी नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टीका केली. हा चित्रपट ‘व्हल्गर’ (अश्लिल) आणि ‘प्रोपगंडा’ (प्रचारकी) असल्याचे मत नदव लॅपिड यांनी मांडले. यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. या प्रकरणी इस्रायलने ज्युरी नदव लॅपिड यांना चांगलेच फटकारले आहे.
जगभरात उमटले पडसाद
- या प्रकरणी इस्रायलने आपली चूक मान्य केली आहे आणि त्याबद्दल भारताची माफीही मागितली आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत नूर गिलन म्हणाले, ‘भारतीय संस्कृतीत पाहुणा हा देवासारखा आहे. तुम्हाला इफ्फी २०२२ साठी ज्युरी समितीच्या अध्यक्षपदासाठी भारताने निमंत्रित केले. त्यांच्या विश्वासाचा आणि सन्मानाचा अत्यंत वाईट मार्गाने गैरवापर केला आहे.
- ज्युरी बोर्डानेही नदव लॅपिडच्या यांच्या वक्तव्यापासून दूर राहणे पसंत केले. ज्युरी बोर्डाने सांगितले की, ‘ज्युरी म्हणून, आम्हाला चित्रपटाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. आम्ही कोणत्याही चित्रपटावर कोणत्याही प्रकारची राजकीय टिप्पणी करत नाही आणि जर ते एखाद्याच्या वतीने केले असेल तर ते त्यांचे वैयक्तिक मत असेल.’
(हेही वाचा आफताब तर निघाला तालिबानी जिहादी…)
- नदव लॅपिड यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर यांनी ‘खोट्याची उंची कितीही जास्त असली तरी सत्याच्या तुलनेत ते नेहमीच लहान असते’, असे म्हणत ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील त्यांचे फोटोही शेअर केले आहेत.
- अभिनेता दर्शन कुमारनेही नदव लॅपिडच्या विधानावर टीका केली आहे की, ‘द काश्मीर फाईल्स’ हा असा चित्रपट आहे, ज्यामध्ये एका काश्मिरी पंडिताची दुर्दशा दाखवण्यात आली आहे, हे सत्य नाकारता येणार नाही.
- चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत, ‘सत्य ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. हे लोकांना खोटे बोलण्यास भाग पाडू शकते.’