- ऋजुता लुकतुके
पहिल्या गिअरसाठी हँडलजवळ बटन, गिअरबॉक्स नाही तर शिफ्ट पॅडल्स असं अत्याधुनिक तंत्रज्जान घेऊन आलेली कावासाकीची ही निंजा बाईक आहे. पण, काय आहे तिची किंमत?
कावासाकी निंजा ७ एचईव्ही या नावात एचईव्ही म्हणजेच हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकल. म्हणजेच इलेक्ट्रिक बाईक, पण गरज असेल तर पेट्रोलवरही चालू शकणारी अशी ही कावासाकीची बाईक आहे. तिच्यात इतरही अत्याधुनिक फिचर्स आहेत. बाईकमध्ये पायाजवळ जे क्लच गिअर शिफ्टर असतात त्यांची जागा या बाईकमध्ये हाताजवळ असणाऱ्या गिअर शिफ्ट्सनी घेतली आहे. तर सुरक्षिततेसाठी कुठल्याही गिअरमधून पहिल्या गिअरमध्ये यायचं असेल तर त्यासाठी आहे फक्त एक बटन. हे या गाडीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
गाडीत ४५१ सीसी क्षमतेचं ट्विन इंजिन आहे. तर ९ किलोवॅट क्षमतेची ट्रॅक्सन मोटर आणि ४८ वोल्ट्सची बॅटरी.
कावासाकीच्या निंजा श्रेणीशी प्रामाणिक असा नवीन बाईकचा लूक आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये कंपनीने पहिल्यांदा या बाईकची झलक लोकांना दाखवली होती.
Kawasaki Ninja 7 HEV: A Fusion of Power and Efficiency https://t.co/eKotqWSVG9 pic.twitter.com/8SfgGvfP5r
— Motoroids (@Motoroids_India) October 9, 2023
(हेही वाचा – Zomato GST Notice : जीएसटी न भरल्याने झोमॅटोला 400 कोटींची कारणे दाखवा नोटीस)
ही बाईक पर्यावरणपूरक आहे असा कंपनीचा दावा आहे. आणि त्यासाठी इलेक्ट्रिक मोटर असण्याबरोबरच याच आणखी दोन महत्त्वाच्या सोयी आहेत. बाईकचा वेग शून्यावर आला तर तिचं इंजिन आपोआप बंद होतं. आणि थ्रॉटल ग्रिप फिरवली तर बाईक पुन्हा सुरूही होते. बाईकच्या हँडलवर मध्यभागी डिजिटल डिस्प्लेही आहे, जो ब्लूटूथने जोडला की, त्यावर तुम्हाला नेव्हिगेशन सुविधाही मिळते.
ईको स्पोर्ट, ईको-हायब्रीड आणि इलेक्ट्रिक अशा तीन मोडमध्ये ही बाईक कावासाकीने आणली आहे. सध्यातरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही बाईक बाजारात येईल असा अंदाज आहे. आणि तिची सुरुवात युरोपीयन बाजारपेठेतून होणार आहे. भारतात या बाईकची किंमत साधारपणे ८,५०,००० रुपयांपासून असेल असा अंदाज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community