The Kerala Story : चित्रपटाला भारतात विरोध; परदेशात मात्र समर्थन

244
चित्रपटाला भारतात विरोध; परदेशात मात्र समर्थन
चित्रपटाला भारतात विरोध; परदेशात मात्र समर्थन

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. देशातील काही राज्यांत चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे, तर काही राज्यांत त्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतात या चित्रपटाला विरोध होत असला तरी परदेशात मात्र या चित्रपटाला जोरदार समर्थन मिळत आहे. तशी माहिती स्वतः अदा शर्मा या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रीने ट्विट करत दिली आहे.

अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहण्याची विनंती करत आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई करताना दिसून येत आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यात बंदी घालण्यात आली आहे. या राज्यांत या चित्रपटाला विरोध आणि प्रदर्शन होत आहे आणि त्यामुळे समाजात त्यामुळे तेढ निर्माण होईल अशी कारणे देत या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. पण आता त्यानंतर या चित्रपटाबाबतीत एक चांगली बातमी समोर येत आहेत. ‘द केरळ स्टोरी’ रिलीज झाल्यापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही तो टॅक्स फ्री दाखवण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. या सगळ्यांमध्ये चित्रपटाबाबतीत एक चांगली बातमी समोर येत आहे, जी ऐकून चाहते नक्कीच खुश होतील. हा चित्रपट आता जवळपास 37 देशांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी, केरळ स्टोरीची मुख्य अभिनेत्री अदा शर्माने ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे. तिच्या चित्रपटाचांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तिने चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

(हेही वाचा Maharashtra Political crisis : अपात्रतेची टांगती तलवार; एकनाथ शिंदेंसह कोण आहेत ‘ते’ १६ आमदार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.