
-
प्रतिनिधी
राज्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळांचे जाळे उभारण्यात येत असून, या प्रयोगशाळा सायबर गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.
डी. बी. नगर पोलीस स्टेशन येथे दक्षिण मुंबई विभागाच्या ‘निर्भया सायबर प्रयोगशाळे’चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुंबई (मध्य) विभागासाठी वरळी पोलीस स्टेशन येथील व मुंबई (पूर्व) विभागासाठी गोवंडी पोलीस स्टेशन येथील सायबर प्रयोगशाळांचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
(हेही वाचा – Akshay Shinde चकमकप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करा; उच्च न्यायालयाचा आदेश)
या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, अप्पर मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंह चहल, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी सांगितले की, सायबर गुन्ह्यांचा तपास वेगवान आणि अचूक व्हावा यासाठी अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळांची गरज आहे. सध्या मुंबई शहरात पाच सायबर प्रयोगशाळा प्रस्तावित असून त्यापैकी तीन प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – “तनिषा भिसेंना ५ तास रक्तस्राव, योग्य ते उपचार दिले नाहीत म्हणून…” ; Rupali Chakankar यांच्याकडून धक्कादायक खुलासे)
फोडलेला मोबाईल, डिलीट केलेला डेटा… आता होणार रिकव्हर!
या प्रयोगशाळांमुळे महिलांवर सायबर माध्यमातून होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे कमी कालावधीत सिद्ध करता येणार आहेत. विशेष म्हणजे, गुन्हा लपवण्यासाठी किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी जर एखाद्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातील डेटा डिलीट करण्यात आला असेल, मोबाईल टेम्पर किंवा फोडण्यात आला असेल, तरीही या आधुनिक प्रयोगशाळांमध्ये त्या उपकरणातील संपूर्ण डेटा अत्याधुनिक संगणक प्रणालीच्या मदतीने ‘रिकव्हर’ करता येणार आहे.
या प्रयोगशाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून त्यामध्ये जागतिक स्तरावरील अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे. आर्थिक सायबर गुन्ह्यांवरही – जसे की ऑनलाइन फसवणूक, बँक खात्यांची हॅकिंग, पैशांची परस्पर हेराफेरी – नियंत्रण मिळवण्यात या प्रयोगशाळा प्रभावी ठरणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) नमूद केले. सायबर सुरक्षा आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य शासनाने उचललेले हे पाऊल भविष्यकालीन दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community