गोरेगावातील इनॉर्बिटकडील वाहतूक बेट ‘लेझर शो’ने उजळले!

रविवारी, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत गोरेगाव पश्चिम येथील इनॉर्बिट मॉलसमोरील वाहतूक बेटावर तिरंग्याच्या रंगाच्या छटा प्रतिबिंबीत होणारी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

आजवर केवळ साचेबंद काम करणाऱ्या मुंबई महापालिकेकडून आता विविध आकर्षक कामे करत मुंबईच्या सुशोभिकरणात भर पाडली जात आहे. गोरेगाव येथील इनॉर्बिट मॉलसमोरील दुर्लक्षित असलेल्या वाहतूक बेटाचे सुशोभिकरण महापालिकेच्यावतीने करण्यात आले असून या माध्यमातून गोरेगावच्या सुंदरतेत अजून एक भर पाडली आहे. येथे सिंगापूरच्या धर्तीवर वाहतूक बेटांचे सुशोभिकरण करताना त्यांवर रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करून या वाहतूक बेटाला सुंदरतेचा साजश्रुंगार चढवला गेला आहे. या सुशोभित वाहतूक बेटावर प्रत्येक सण आणि दिनाचे औचित्य साधून त्यानुसारच विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

वाहतूक बेट कायमस्वरुपी विद्युत रोषणाईने न्हाऊन निघणार

रविवारी, १५ ऑगस्ट असून या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत गोरेगाव पश्चिम येथील इनॉर्बिट मॉलसमोरील वाहतूक बेटावर तिरंग्याच्या रंगाच्या छटा प्रतिबिंबीत होणारी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. ज्यामुळे या वाहतूक बेटाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा एक वेगळाच आनंद पहायला मिळत आहे. आजवर या दुर्लक्षित असलेल्या या वाहतूक बेटावर सिंगापूरच्या धर्तीवर आकर्षक अशा स्वरुपाची उभारणी करत त्यांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. नुतनीकरण केलेले हे वाहतूक बेट कायमस्वरुपी विद्युत रोषणाईने न्हाऊन निघणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्टचे औचित्य साधून शनिवारपासून या वाहतूक बेटावर तिरंग्याच्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक दिवशी त्या त्या दिनाच्या विशेषाप्रमाणे तसेच सणांप्रमाणे विद्युत रोषणाई करत त्यांचे महत्व पटवून दिले जाणार आहे. त्या माध्यमातून एकप्रकारे या परिसराच्या सुशोभिकरणात भर पाडली गेली आहे.


(हेही वाचा : आता नगरसेवक निधीतून मिळणार नाही १० लिटर कचऱ्याचे डबे!)

प्रजासत्ताक दिनांचे औचित्य साधून तिरंग्याच्या रंगाची रोषणाई

पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे सहायक अभियंता (परिरक्षक) ओमकार गिरकर, दुय्यम अभियंता (परिरक्षक) निशा दळवी, कनिष्ठ अभियंता शुभम खैरनार आदींच्या प्रयत्नातून हे सुशोभिकरण करण्यात आले आहे. मुंबईत आजवर अनेक चौकांचे सुशोभिकरण केले जात आहे. परंतु आकर्षक लेझर शोद्वारे विद्युत रोषणाई केलेले हे पहिले वाहतूक बेट आहे. आजवर अशाप्रकारच्या लेझर शोद्वारे स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताक दिनांचे औचित्य साधून तिरंग्याच्या रंगाची रोषणाई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महापालिका मुख्यालय इमारतींवर केली जाते. आता या दोन वास्तूंबरोबरच आता गोरेगाव येथील वाहतूक बेटही विविध दिव्यांनी उजळून निघताना सणांचे विशेषत:ही लक्षात आणून देत नागरिकांच्या आनंदात भर पाडणार आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here