पुण्याचा बिबट्या झाला अंबरनाथकर

पुण्यात जन्मलेल्या पाच वर्षांच्या नरबिबट्याने आता अंबरनाथला आपले नवे घर बनवल्याने सध्या वन्यजीव वर्तुळात चर्चा सुरु आहे. चार महिन्यांपासून बिबट्याच्या वावरात मानवी वस्तीजवळील गाय आणि अनेक वासरांचा फज्जा उडाल्याने या बिबट्याला परतवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. वन्यजीवप्रेमी मात्र शहरीजीवनात मिसळणा-या या बिबट्याला सांभाळण्यासाठी वनविभागाच्या आवश्यक सूचनांचे पालन करा, अशी विनंती स्थानिकांना करत आहेत.

नोव्हेंबर महिन्यापासून बिबट्याने बक-या आणि वासराला आपले भक्ष्य करण्यास सुरुवात केल्यानंतर स्थानिकांमध्ये बिबट्याविरोधात वातावरण आहे. बिबट्या स्थानिक नाही. शहरी जीवनात बिबट्याला सामावणे कितपत सुकर राहील, असा प्रश्न स्थानिकांनी वनविभागाला विचारला. बिबट्याच्या वाढत्या शिकारीनंतर मात्र बिबट्याला पकडण्याची मागणी स्थानिकांकडून जोमाने सुरु झाली असल्याची माहिती ठाणे वनविभाग (प्रादेशिक)च्या कल्याण परिसराचे वनक्षेत्रपाल संजय चेण्णे यांनी दिली. मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी तसेच बिबट्याच्या नव्या अधिवासात स्थानिकांनी आवश्यक काळजी घेण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहितीही चेण्णे यांनी दिली.

(हेही वाचा मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईला मिळाले दुसरे रडार…)

बिबट्याच्या दर्शनाचा घटनाक्रम 

  • सप्टेंबर २०२१ – मुरबाड परिसरात बिबट्या दिसत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. बिबट्या सातत्याने दिसून आढळला नसल्याचे निरीक्षण वनविभागाने नोंदवले.
  • ऑक्टोबर २०२१ – बिबट्याचे कल्याण परिसरात दर्शन दिसून लागल्याने वनविभागात गस्त सुरु केली. या महिन्यांत कल्याण परिसरात पाऊसही होता. त्यामुळे बिबट्याच्या पावलाचे ठसे दिसून आले नाहीत.
  • नोव्हेंबर २०२१ – कल्याणजवळीत जंगलात बिबट्याने गायीचे वासरु मारले. वासरु मेल्याचे समजताच वनविभागाने ट्रेप कॅमेरा लावला त्यात बिबट्या आढळून आला. बिबट्याला रॅडिओ कॉलरिंग केले होते. चौकशीनंतर जुन्नर परिसरातील रॅडिओ कॉलर केलेला बिबट्या कल्याणला आल्याचे वनविभागाच्या लक्षात आले.

बिबट्याचा वावर असल्यास 

  • रात्रीच्यावेळी संबंधित भागांत जाणे शक्यतो टाळा. काही कामानिमित्ताने घराबाहेर जायचे असल्यास गर्दीने मोठा आवाज करत जा
  • रात्रीच्यावेळी घराबाहेर असल्यास मोबाईलवर मोठ्याने गाणे लावा, तसेच हातात टॉर्च ठेवा
  • घरातील कच-याचे योग्य व्यवस्थापन करा
  • बिबट्याचा वावर असलेल्या भागांत जंगल परिसरात नैसर्गिक विधीसाठी जाणे टाळा

बिबट्या हा निशाचर प्राणी आहे. शहरी जीवनाजवळील सहज मिळणारे खाद्य बिबट्या पसंत करतो. बिबट्याला डोळ्याच्या समांतर दिसणा-या प्राण्यावर हल्ला करता येतो. कित्येकदा वन्यप्राणी किंवा कुत्रा, बकरी समजून बिबट्या माणसावर हल्ला करतो. मात्र माणूस असल्याचे लक्षात येताच जखमी अवस्थेतच माणसाला सोडून पलायन करतो. बिबट्या नरभक्षक नाही. मात्र माणसाच्या वाढत्या वावराने त्रासलेल्या बिबट्याने स्वसंरक्षणासाठी किंवा रेस्क्यू केल्यानंतर भलत्याच ठिकाणी वनविभागाकडून सोडल्यानंतर मानव-बिबट्या संघर्षाच्या नोंदी दिसून आल्या आहेत.

बिबट्याला जेरबंद करण्याचे नियम

बिबट्याचे मानवावर हल्ले वाढल्यास किंवा हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्यास बिबट्याला वनविभाग जेरबंद करते.

अफवांचे पीक जास्त जीवघेणी

उल्हासनगरमध्ये वाघ दिसल्याची अफवा पसरल्याने मोठा अपघात होण्याची भीती असते. स्थानिक प्रशासकीय संस्थांना अफवांमुळे तणावाला सामोरे जावे लागते. समाजमाध्यम किंवा प्रसारमाध्यमांवर मिळालेल्या माहितीची अगोदर खातरजमा करा. वन्यजीवांच्या माहितीसाठी वनविभागाने १९२६ ही मोफत हेल्पलाईन उपलब्ध केली आहे. त्याआधारे माहितीची छाननी करा नंतरच माहितीची देवाणघेवाण करा.
– अविनाश हरड, मानद वन्यजीव रक्षक, ठाणे वनविभाग

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here