यंदाच्या गणेशोत्सवात झाले ध्वनीप्रदूषण, मुंबईत कुठे किती वाढला आवाज?

104
मागील २ वर्षे कोरोना संकटात गेल्यानंतर यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच कोरोना रुग्ण संख्याही घटली होती. त्यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करतानाच गणेश भक्तांनी ध्वनी नियंत्रणाचे भान पाळले नाही. अनंतचतुर्दशीच्यादिवशी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केले. मुंबईतील आवाजाची कमाल पातळी थेट 2019 सालच्या आवाजाच्या पातळीपर्यंत पोहोचली. यंदा मुंबईत आवाजाची पातळी थेट 120.2 डेसिबलपर्यंत पोहोचली. 2019 साली 121.3 डेसिबलपर्यंत आवाजाची पातळी मोजली गेली होती.
गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांनी मोठमोठे स्पीकर लावून नाचगाणे केले, वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे ट्विटरवर पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यात आल्या, त्यामुळे काही ठिकाणी मिरवणूक थांबवली, अशी माहिती आवाज फाउंडेशनच्या प्रमुख सुमैरा अब्दुलली यांनी दिली.

कुठे किती झाले ध्वनीप्रदूषण?

ऑपेरा हाऊसनंतर सांताक्रूझ येथील शास्त्री नगरमध्ये 118 डेसिबल ध्वनीची नोंद झाली, वरळी आणि पेडररोड येथे 105 डेसिबल, वरळी नाका येथे 102 डेसिबल, जुहू तारा येथे 101 डेसिबल एवढी आवाजाची पातळी नोंदवली गेली. दादर येथील शिवाजी पार्क परिसरात 99 डेसिबलपर्यंत आवाजाची पातळी नोंदवली गेली. मोठमोठ्या गणपती मंडळाच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या गिरगाव चौपाटीत सर्वात कमी ध्वनी प्रदूषण झाल्याचे आवाज फाऊंडेशनच्या मोजमापात दिसून आले. गिरगाव चौपाटीत केवळ 93 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा नोंदवली गेली. बहुतांश भागात मिरवणुकीत बेंजो दणक्यात सुरु होता, परिणामी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले, अशी माहिती आवाज फाउंडेशनच्यावतीने दिली गेली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.