वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ(सीबीएसई)च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर आता ठाकरे सरकार देखील राज्यातील 12वीची परीक्षा रद्द करण्याच्या विचारात आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत यावर एकमत झाले असून, आपत्ती व्यवस्थापन विभागाला राज्य सरकार प्रस्ताव पाठवणार आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील माध्यमांशी बोलताना परीक्षा रद्द करण्याबाबत संकेत दिले असून, आमची भूमिका ही स्पष्ट आहे, असे सांगितले. आम्ही आपत्ती व्यवस्थापनाला प्रस्ताव पाठवल्याचे त्या म्हणाल्या. तसेच येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करू असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या राज्य सरकारला मुलांचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाशी खेळ होणार नाही, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचाः ठाकरे सरकारवर टीका, केंद्राच्या निर्णयावर मात्र भाजप नेते गप्प!)
मुख्यमंत्री-शिक्षणमंत्र्यांकडून मोदींच्या निर्णयाचे स्वागत
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून 12वी तसेच अशा काही महत्वाच्या परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरुन योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली होती.
Join Our WhatsApp Community